January 11, 2026 1:54 PM

views 19

प्रधानमंत्री आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यात अहमदाबाद इथं द्विपक्षीय चर्चा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यात उद्या अहमदाबाद इथं द्विपक्षीय चर्चा होणार आहे. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, आणि संरक्षण क्षेत्राविषयी यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेनं केलेल्या आक्रमणासह इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भ...

January 11, 2026 1:52 PM

views 15

फ्रान्स आणि लॅक्झेंबर्गचा दौरा आटोपून परराष्ट्र व्यवहार मंत्री परतले मायदेशी

फ्रान्स आणि लॅक्झेंबर्गचा दौरा आटोपून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज मायदेशी परतले. सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत आणि युरोप यांचे हितसंबंध परस्परपूरक  असल्याचं या दौऱ्यामधून दिसून आल्याचं  परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.  या दौऱ्यात जयशंकर यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ...

January 11, 2026 1:43 PM

views 41

सोमनाथ स्वाभिमान पर्वात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग

सोमनाथचा इतिहास हा विजय आणि पुनर्निर्माणाचा तसंच आपल्या पुर्वजांच्या पराक्रम, त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधल्या सोमनाथ इथं सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विदेशी आक्रमकांनी सोमनाथ आणि भारताला नष्ट करायचा...

January 11, 2026 1:33 PM

views 36

दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट

दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाटेचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ओडिशातही थंडीची लाट राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढल्या दोन दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड  इथं दाट धुक्...

January 11, 2026 1:22 PM

views 15

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक होणार

रशियाने यूक्रेनवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक उद्या होणार आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी ही माहिती दिली. या हल्ल्यांमध्ये मध्यम-पल्ल्याच्या मारक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. हे हल्ले त्वरि...

January 11, 2026 1:19 PM

views 22

बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांत वाढ

बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एका हिंदू धर्मीय तरुणाला मारहाण करुन जबरदस्तीनं विष प्यायला लावल्याची घटना समोर आली आहे.  सुनामगंजमधे देराई इथं मोबाईल फोनचा हप्ता भरण्यावरुन झालेल्या वादात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला.  पोलीस तपास सुरु असल्याचं आकाशवाणी वार्ताहरान...

January 11, 2026 11:17 AM

views 37

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनं तीव्र

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत. इराणमधील या अशांत परिस्थितीला दहशतवादीच जवाबदार असल्याचं इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने म्हटलं आहे. इराणमध्ये सध्या इंटरनेट बंद असून तिथल्या सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती मिळणं अवघड होत आहे. तेहरानसह रश्त, तब्रीझ, शिराझ, केरमानमध्ये महागाईच्या विरो...

January 11, 2026 6:26 PM

views 127

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला सामना वडोदरामध्ये सुरु

भारतीय क्रिकेट संघाच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या न्यबझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, आज वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात, न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी ३०१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूझीलंडनं निर्धारित ५० ष...

January 11, 2026 9:02 AM

views 28

देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची – मनसुख मांडवीय

देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. विकसित भारत युवा नेता संवाद 2026 परिषदेचं उद्घाटन मांडवीय यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, शाश्वत पर्याय आण...

January 10, 2026 8:52 PM

views 32

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २८ जानेवारीपासून सुरुवात

अर्थसंकल्पपूर्व प्रक्रियेचा भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक झाली. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीला सुरू...