December 18, 2025 2:51 PM December 18, 2025 2:51 PM

views 5

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत ३ नक्षली ठार

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत आज तीन नक्षली मारले गेले. गोलापल्ली पोलीस ठाणे परिसरात आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलींमधे चकमक सुरू झाली, यात तीन नक्षलींचा मृत्यू झाला. छत्तीसगड राज्यात या वर्षभरात २८४ नक्षली चमकमीकत मारले गेल्याचं सुरक्षा दलानं म्हटलं आहे.  

December 18, 2025 1:33 PM December 18, 2025 1:33 PM

views 7

‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ लोकसभेत सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत ‘सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल २०२५’ सादर केलं. भारतीय शेअर बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं, हे या विधेयकाचं  उद्दिष्ट आहे. हे विधेयक पुढल्या छाननीसाठी आर्थिक विषयावरच्या संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्...

December 18, 2025 5:49 PM December 18, 2025 5:49 PM

views 1

व्हीबी – जीरामजी विधेयक मागे घेण्यासाठी विरोधकांचं निदर्शन

व्हीबी- जी राम जी हे विधेयक मागे घ्यावं, या मागणीसाठी आज विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. मनरेगाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते मकरद्वारापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चाही काढला. केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला असून भारताच्या ...

December 18, 2025 1:18 PM December 18, 2025 1:18 PM

views 19

भारत-ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला नवी दिशा आणि गती देईल – प्रधानमंत्री

भारत - ओमान व्यापार शिखर परिषद दोन्ही देशांच्या भागीदारीला एक नवी दिशा आणि गती देईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज ओमानची राजधानी मस्कत इथं शिखर परिषदेला संबोधित करत होते. ओमान आणि भारत प्राचीन काळापासून एकमेकांसोबत व्यापार करत आहेत, अरबी समुद्र दोन्ही देशांना जोडणारा...

December 18, 2025 7:01 PM December 18, 2025 7:01 PM

views 43

शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

ख्यातनाम  शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज  नोएडा इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच राज्य शासनाच्या वतीनं  राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.अंत्यसं...

December 17, 2025 8:27 PM December 17, 2025 8:27 PM

views 17

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा आणि देखभाल शुल्क, मध्यस्थ शुल्कावर मर्यादा आणणाऱ्या सुधारणा सेबीनं आज जाहीर केल्या. नव्या आर्थिक वर्षापासून हे नियम लागू होतील. याशिवाय शेअर ब्रोकरच्या नियमावलीत सुधारणाही सेबीच्या संचालक मंडळानं मंजूर केल्याचं सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी आज जाहीर केलं...

December 17, 2025 8:59 PM December 17, 2025 8:59 PM

views 23

खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून ८० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार

गैरसरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर एनपीएसमधून ६० ऐवजी ८० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढून घेता येईल. उर्वरित २० टक्के रक्कम ॲन्युईटी योजनेत गुंतवावी लागेल. यासंदर्भातले नियम पीएफआरडीए अर्थात पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं जारी केले आहेत. एनपीएस खात्यात जमा असलेली ...

December 17, 2025 8:16 PM December 17, 2025 8:16 PM

views 4

विमा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूक वाढवणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी

विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक सध्याच्या ७४ टक्क्यावरून १०० टक्क्यावर नेणारं, सबका बिमा, सबकी रक्षा विधेयक राज्यसभेनं आज संमत केलं. या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या अनेक सुधारणा सभागृहानं नामंजूर केल्या. या विधेयकामुळे परदेशी कंपन्यांना विमा क्षेत्रात अधिकाधिक भांडवल आणता येईल, तसंच अधिकाधिक ना...

December 17, 2025 8:15 PM December 17, 2025 8:15 PM

views 4

ओमानमधे संरक्षण आणि धोरणात्मक भागिदारी बळकट करण्यावर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओमानमधे मस्कत इथं पोचले. विमानतळावर ओमानचे उपप्रधानमंत्री सय्यद शिहाब बिन तारिक अल सईद यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आणि ओमाने उपप्रधानमंत्री सईद यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. भारत आणि ओमान यांच्यातलं संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य बळकट करणं आणि धोरणात्मक भा...