October 26, 2025 1:55 PM

views 107

मोंथा चक्रीवादळआंध्र प्रदेश किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा जोर वाढत असून, ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं मदत कार्याची तयारी सुरु केली आहे. किनारपट्टीवरच्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची ८ आणि एसडीआरएफची ९ पथकं तैनात करण्यात आली आहेत. मच्छिमारांनी ...

October 26, 2025 12:32 PM

views 38

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला दोन रौप्य पदक

सर्बिया इथं झालेल्या अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हंसिका लांबा आणि सारिका मलिक यांनी रौप्य पदक मिळवलं. हंसिका लांबा चा  ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत जपानच्या हारुणा मोरिकावा नं  ०-४ असा पराभव केला. ५५ किलो वजनी गटात सारिका मलिकचा जपानच्या रुका नतामी नं पराभव केला. 

October 26, 2025 12:14 PM

views 10

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन दोन दिवसांच्या सेशेल्स दौऱ्यासाठी  रवाना

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आज दोन दिवसांच्या सेशेल्स दौऱ्यासाठी  रवाना झाले. सेशेल्सचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथविधी समारंभाला ते उपस्थित राहतील.  सेशेल्स हा भारताच्या ‘व्हिजन महासागर’ या दृष्टिकोनाचा  महत्त्वाचा भागीदार असून, ही भेट सेशेल्स बरोबरची आपली भागीदारी आ...

October 26, 2025 10:54 AM

views 20

तामिळनाडूमधील रामनाथपुरम, शिवगंगा, थुथुकुडी आणि विरुधुनगर जिल्हे प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत समाविष्ट

तामिळनाडूमधील रामनाथपुरम, शिवगंगा, थुथुकुडी आणि विरुधुनगर जिल्हे प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत समाविष्ट असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हंटलं आहे. या प्रकल्पांतर्गत, शेतकऱ्यांना व्यापक लाभ देण्यासाठी 36 योजना एकत्रित केल्या जात असल्याचं वेल्लोर इथल्या शे...

October 26, 2025 9:03 AM

views 49

दक्षिण आशिया अॅथलेटिक्स स्पर्धेत पाच सुवर्ण पदकांसह भारताची 15 पदकांची कमाई

रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या दक्षिण आशिया अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये कालच्या पहिल्याच दिवशी पाच सुवर्ण पदकांसह भारतानं 15 पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या पांच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताच्या प्रिन्स कुमारनं देशाला या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं. महिलांच्या पांच हजार मीटर धा...

October 26, 2025 9:01 AM

views 69

पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचाऑस्ट्रेलियावर 9 गडी राखून विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पन्नास षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना भारतानं 9 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 236 धावा केल्या. भारताकडून हर्षित राणानं सर्वाधिक 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नाबाद 168 धावांची भागीदारीच्या जोरावर भारतानं...

October 26, 2025 8:55 AM

views 138

राज्य परिवहन महामंडळाचं शयनसुविधा असलेल्या बसगाड्यांसाठी ‘सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास’ अभियान सुरू

आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्याकरिता राज्य परिवहन महामंडळानं शयनसुविधा असलेल्या बसगाड्यांसाठी 'सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास' अभियान सुरू केलं आहे, अशी माह...

October 26, 2025 8:53 AM

views 21

पशुधनाच्या नुकसानापोटी मिळणाऱ्या भरपाईच्या निकषांत बदल

विविध कारणांनी पशुधनाच्या नुकसानापोटी मिळणाऱ्या भरपाईचे निकष आता बदलण्यात आले आहेत. त्यानुसार आता प्रत्येक जनावराच्या मृत्यूची नुकसान भरपाई पशुपालकांना मिळणार आहे. पूर्वीच्या नियमानुसार केवळ तीन जनावरांसाठी मदत दिली जात होती. राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीनं शेतीबरोबरच 28 जिल्ह्यांमध्ये पशुधनाचं मो...

October 26, 2025 8:41 AM

views 258

रिध्दपूर इथं जागतिक कीर्तीचं मराठी भाषा विद्यापीठ उभारणार-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

'सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्याबरोबर समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. ही विचारसरणी राज्यासह देशासाठी महत्वाची आहे', असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नाशिक इथं आयोजित अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या 38 व्या अधिवेशनात ते काल बोलत होते...

October 25, 2025 8:36 PM

views 46

पादत्राणे उद्योगासाठी जीएसटीचे नवे  दर लागू झाल्यामुळे नागरिकांना लाभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नुकत्याच लागू केलेल्या जीएसटी दर सुधारणांमुळे गेल्या २२ सप्टेंबर पासून देशभरात बचत उत्सव सुरु झाला आहे. पादत्राणे उद्योगासाठी जीएसटी चे नवे  दर लागू झाल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे. याबद्दल आमच्या प्रतिनिधीनं माहिती दिली.     (जीएसटीच्...