June 16, 2024 8:48 PM

views 31

योग्य जागा दिल्या नाहीत तर ३० जागांवर निवडणूक लढणार – पीपल्स रिपब्लिकन पक्ष

विधानसभा निवडणुकीत महायुतीनं योग्य जागा दिल्या नाहीत तर आपण राज्यात ३० जागांवर निवडणूक लढणार असल्याचं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं आहे. ते ठाण्यात बातमीदाराशी बोलत होते. राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि एका महामंडळात पक्षाला प्रतिनिधित्व द्यावं, ...

June 16, 2024 8:05 PM

views 49

कापूस, सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान

कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या मूल्यसाखळीला चालना देण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलच्या mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.   चालु वर्षातल्या खरीप हंगामासाठी नॅनो युरिया सोया...

June 16, 2024 8:05 PM

views 35

पंढरपूर येथे धनगर समाजाची विविध मागण्यासाठी बैठक

पंढरपूर इथं आज सोलापूर जिल्ह्यातल्या धनगर समाजाची बैठक झाली. धनगर समाजातल्या तरुणांना तीस लाख बिनव्याजी कर्ज मिळावं, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवनासाठी पंढरपुरात जागा उपलब्ध करून द्यावी, अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला येत्या अधिवेशनात निधी वर्ग करावा, आदी मागण्या राज्य सरकारकडे करण्याचा ठराव ...

June 16, 2024 8:06 PM

views 38

कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मंत्री छगन भुजबळ अडचणीत

कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी येत्या २८ तारखेला होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे स्पष्ट आदेश मुंबईतल्या सत्र न्यायालयानं राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहेत. सुनावणीला गैरहजर राहिले तर वॉरंट बजावण्याचा इशाराही न्यायालयानं दिला आहे.   मुंबईत कलिना इथं राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या क...

June 17, 2024 10:01 AM

views 27

महिला क्रिकेट : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १४३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे बंगळुरु इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर १४३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित षटकात आठ बाद २६५ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ३८ व्या षटकातच १...

June 17, 2024 2:30 PM

views 35

‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधे राष्ट्रवादी काँग्रेस ८५ ते ९० जागा मागणार’

आगामी विधानसभा निवडणुकीत ८५ ते ९० जागा लढवण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला आहे. महायुतीमधे तेवढ्या जागा पक्ष मागणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी आज गोंदिया इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. लोकसभा निवडणुकीत NDA ला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत च...

June 17, 2024 3:26 PM

views 39

‘वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वापरलेल्या मोबाईलचा मतमोजणीशी संबंध नाही’

ईव्हीएम, अर्थात ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अनलॉक करण्यासाठी ओटीपीची गरज लागत नाही, ते कशाशीही जोडलेलं नसतं, असं वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. या मतदारसंघातल्या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी लागणारा मोबाईल शिवसेनेचे उमेदवार रवींद्...

June 17, 2024 3:28 PM

views 53

एसटी महामंडळ ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम राबवणार

एसटी महामंडळाकडून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही मोहीम १८ जूनपासून राबवली जाणार आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना एसटी बसचे पास आता थेट शाळेत मिळणार आहेत. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक माधव कुसेकर यांनी यासंदर्भात स्थानिक एसटी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसंच शाळा, महाविद्यालयां...

June 16, 2024 3:33 PM

views 30

भारतीय रेल्वेच्या नावे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद

भारतीय रेल्वेच्या नावे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विविध ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांच्या सहभागासाठी ही नोंद झाली आहे. रेल्वेने गेल्या २६ फेब्रुवारीला विविध दोन हजार ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्यात ४० लाख १९ हजार लोक सहभागी झाले होते....

June 16, 2024 3:26 PM

views 54

राज्यशासन अधिकारी महासंघाच्या मागण्यांबद्दल राज्यशासन सकारात्मक – एकनाथ शिंदे

  राज्यशासन अधिकारी महासंघाच्या मागण्यांबद्दल राज्यशासन सकारात्मक असून त्याबद्दल लवकर निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती अधिकारी महासंघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.   सेवानिवृत्तीचं वय साठ वर्षे करावं, केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्त्यात वाढ, अतिर...