June 23, 2024 11:08 AM

views 43

नीट परीक्षा 2024 मधील कथित गैरव्यवहार प्रकरणी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून सहा जणांना अटक

नीट परीक्षेच्या वादात राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. भारतीय व्यापार प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे एनटीएच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान नीट परीक्षा 2024 मध...

June 23, 2024 10:21 AM

views 48

नायजेरियात सुरू असलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीजा अकुला हिचा अंतिम फेरीत प्रवेश

नायजेरियातील लागोस इथं सुरू असलेल्या डब्ल्यू टी टी कंटेंडर या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीजा अकुला हिने महिला एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत एकेरी प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय बनून श्रीजाने इतिहास घडवला. तिने सुतीर्थ मुखर्जीचा 3-2 असा प...

June 23, 2024 10:12 AM

views 23

पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के एकसमान जीएसटी दराची शिफारस

वस्तु आणि सेवा कर परिषदेनं पोलाद, लोह आणि ॲल्युमिनियमपासून निर्मित दुधाच्या कॅनवर 12 टक्के वस्तु आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या एकसमान दराची शिफारस केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या ५३व्या वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना, रेल्वे फलाट तिक...

June 22, 2024 8:22 PM

views 39

आयटीएफ महिला विश्व टेनिस स्पर्धेत रुतुजा भोसले-फानग्रान टियान यांना विजेतेपद

भारताची टेनिसपटू ऋतुजा भोसले आणि तिची साथीदार, चीनची फानग्रान टियान या जोडीनं आयटीएफ महिला विश्व टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. स्पेनच्या तौस्ते इथं झालेल्या या स्पर्धेत ऋतुजा आणि फानग्रान यांनी आपल्या प्रतिस्पर्धी जोडीवर ६-२, ६-४ असा सहज पराभव केला आणि जेतेपद पटकावलं.

June 22, 2024 8:18 PM

views 17

इमिग्रेशन प्रक्रिया वेगवान होण्यासाठी दिल्ली विमानतळावर नव्या सुविधेचं लोकार्पण

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात इमिग्रेशन प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी केंद्र सरकारनं FTI-TTP अर्थात फास्टट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रॅम नावाची विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्ली विमानतळावर झालं. याचा लाभ भारतीय नागरिक आणि अनिव...

June 22, 2024 8:09 PM

views 33

बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्याचे प्रकार रोखण्यासाठी आधारसंलग्न बायोमेट्रीक आधारित यंत्रणा जीएसटीमध्ये राबवली जाणार

बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणारे प्रकार रोखण्यासाठी आधारसंलग्न बायोमेट्रीक आधारित यंत्रणा जीएसटीमध्ये राबवली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या ५३ व्या  बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. गुजरात, पुद्दुचेरीमध्ये याची चाचणी झा...

June 22, 2024 7:57 PM

views 21

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या सोमवारपासून

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या सोमवारपासून, म्हणजेच २४ जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात हंगामी सभापती भर्तृहरी मेहताब नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. लोकसभेच्या नव्या सभापतीपदाची निवडणूक २६ जून रोजी होईल, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जूनला संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करतील....

June 22, 2024 7:46 PM

views 19

शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं न देण्याबाबत सरकार विचार करत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं न देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अहमदनगर इथं मुख्याध्यापक, शिक्षक मेळाव्यात बोलताना सांगितलं. शिक्षकांनी फक्त शिकवण्याचं काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच २००५ पूर्वी सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचंह...

June 22, 2024 7:28 PM

views 32

पाणीपट्टी दरवाढ महाविकास आघाडीच्या काळात झाली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याकडून स्पष्ट

राज्य सरकारनं पाणीपट्टीत दहापट वाढ केल्याची बातमी काँग्रेस पसरवत आहे, मात्र ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळात झाली होती, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं आहे. २९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या ...

June 22, 2024 7:18 PM

views 20

स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १० वर्षांचा तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांचा दंड

विविध स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा केला आहे. दोषींना १० वर्षे पर्यंत तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. या तरतुदी आजपासून लागू होत असल्याचं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटलं  आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आ...