June 24, 2024 3:04 PM

views 31

देशाच्या दक्षिण भागात पुढचे ५ दिवस अतिजोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

देशाच्या दक्षिण भागात पुढचे पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्राचा पुढचा भाग, गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमध्ये पुढे सरकला आहे आणि पुढच्या काही दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्...

June 24, 2024 2:59 PM

views 61

पहलगाम इथं अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक

  जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर अनंतनाग जिल्ह्यात पहलगाम इथं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक काल झाली. यात निवृत्त मेजर जनरल सुधीर बहल यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी असलेल्या विविध संस्था आणि विभागाच्या तयारीचा आढावा घेतला.   एनडीआरएफ,...

June 24, 2024 2:51 PM

views 38

रशियात सशस्त्र हल्लेखोरांनी काल केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७वर

रशियाच्या उत्तर कॉकेशस प्रांतातल्या डर्बेंट आणि माखाचकाला या शहरांमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी काल केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७वर पोहोचली आहे. यात १५ पोलीस अधिकारी,१ धर्मगुरू आणि एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. सहा हल्लेखोर ठार झाले असून इतरांचा शोध सुरू आहे.

June 24, 2024 2:43 PM

views 33

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्रव्यवहार मंत्र्यांची घेतली भेट

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रव्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन सुलतान अल नाहयान यांची अबुधाबी इथं भेट घेतली. या दोन देशांमधल्या वाढत जाणाऱ्या धोरणात्मक भागीदारीवर या भेटीत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमा...

June 24, 2024 2:36 PM

views 30

१२व्या पारपत्र दिनानिमित्त एस जयशंकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

१२व्या पारपत्र दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांना पारपत्र सेवा विश्वासार्ह आणि वक्तशीर मिळावी याकरता पारपत्र कार्यालयं करीत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं.   २०२३ मधे देशात एक कोटी ६५ लाख ...

June 24, 2024 3:12 PM

views 30

नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. केंद्रीय अन्वेषण संस्थेकडे हा तपास सोपवण्यात आला असून सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  नीट-यूजी पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी विविध यंत्रणांनी विविध राज्यांतून अनेक संशयिता...

June 24, 2024 1:36 PM

views 23

संविधानाचं पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाने १८ व्या लोकसभेचे पहिलं अधिवेशन सुरू होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपलं सरकार देशसेवेसाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठा सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. अधिवेशनापूर्वी संसदेच्या आवारात त्यांनी पत्रकारांना सं...

June 24, 2024 1:32 PM

views 49

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी

इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन प्रवेश केला. काँग्रेस, नेते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह अनेक सदस्यांनी घोषणाबाजी केली. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासह इतर खासदारही संविधानाची प्रत घे...

June 24, 2024 1:01 PM

views 22

लोणेरे श्रीवर्धन मार्गावर कार अपघातात ३ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून उलटल्यानंतर त्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला...

June 24, 2024 11:20 AM

views 23

‘मधुमित्र’ पुरस्कारासाठी अंबड गावातील राजू कानवडे यांची निवड

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या 'मधुमित्र' पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या अंबड गावातील शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशापालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून मधमाशांची भुमिका महत...