June 28, 2024 11:23 AM

views 27

डीआरडीओच्या सलग ६ विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण

    संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओनं विकसित केलेल्या अत्याधुनिक अभ्यास या या स्वदेशी प्रणालीने सलग सहा विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या प्रणालीच्या अद्यापपर्यंत १० विकासात्मक परीक्षण चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'अभ्यास'च्या विकासात...

June 28, 2024 11:15 AM

views 27

MSME दिवस काल सर्वत्र उत्साहात साजरा

  जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात MSME दिवस काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.केंद्रिय मंत्री जीतम राम मांझी यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या उद्यमी भारत या कार्यक्रमांत दोन नवीन योजनांची घोषणा केली. MSME टीम आणि यशस्वीनी अशी या योजनांची नावं आहेत.   डिजीटल कॉमर्स क्षेत्रात ओपन नेट...

June 28, 2024 10:31 AM

views 20

नीट-युजी परिक्षेतील पेपरफुटी प्रकरणी झारखंडमधील ओयासीस शाळेच्या मुख्याध्यापकांची चौकशी

वैद्यकीय पदवीपूर्व प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट-युजी परिक्षेतील पेपरफुटी प्रकरणी केंद्रिय अण्वेषण विभाग झारखंडमधील हजारीबाग इथल्या ओयासीस शाळेच्या मुख्याध्यापकांची चौकशी करत आहे. या मुख्याध्यापकांची हजारीबाग शहरासाठीचे नीट परिक्षा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

June 28, 2024 9:54 AM

views 18

मन की बात कार्यक्रमाचा १११ वा भाग येत्या रविवारी

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे सकाळी ११ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेतील तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असून या कार्यक्रमाचा हा १११ वा भाग असेल.   आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, तसेच यूट्यूब चॅनेलवरून तसंच न्यूज ऑन एआ...

June 28, 2024 8:55 AM

views 10

१८वी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

देशातल्या जनतेनं या सरकारला तिसऱ्यांदा निवडून देऊन, गेल्या दहा वर्षातल्या सेवा आणि सुशासनावर पसंतीची मोहोर उमटवली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. अठराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्यांनी संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृ...

June 28, 2024 8:48 AM

views 20

गेल्या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात सादर

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल २०२३-२४ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहांच्या पटलावर मांडला. गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ ७ पूर्णांक ६ दशांश टक्के असेल, असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे....

June 28, 2024 8:40 AM

views 32

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूमधून प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पारंपरिक पद्धतीनं पूजाविधी, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा सुरू होईल. आज पालखी देहुतच इनामदार वाड्यात मुक्कामी असेल.

June 27, 2024 8:07 PM

views 46

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

झारखंडमधल्या रांची विशेष पीएमएलए न्यायालयानं माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. जमीन घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोरेन यांच्यासह अन्य ११ आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर पुढील सुनावणी ११ जुल...

June 27, 2024 7:56 PM

views 18

प्रधानमंत्री येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत आहेत. हा या कार्यक्रमाचा १११ वा, तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच भाग असेल. रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व केंद्र, एआयआर न्यूज हे...

June 27, 2024 7:10 PM

views 36

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच ७९ हजार अंकांची पातळी ओलांडली, तर निफ्टीनंही २४ हजार अंकांचा नवा उच्चांक गाठला. दिवसअखेर सेन्सेक्स ५६९ अंकांची वाढ नोंदवत, ७९ हजार २४३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १७६ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ४४ अंकांवर बंद झाला. आजच्या कामकाज...