June 29, 2024 3:17 PM

views 19

एनटीए च्या परीक्षा येत्या २१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी होणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सी - एनटीएनं रद्द केलेल्या आणि पुढे ढकललेल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एनटीएनं काल जाहीर केलेल्या अधिसूचनेत यूजीसी- नेट जून २०२४ ची परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. सं...

June 29, 2024 3:11 PM

views 29

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य २०२३’ हा अहवाल पूर्वग्रहदूषित असल्याचं सांगत भारतानं फेटाळला

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा ‘आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य २०२३’ हा अहवाल पूर्वग्रहदूषित असल्याचं सांगत भारतानं तो फेटाळला आहे. भारतातील सामाजिक रचनेविषयीचं अज्ञान या अहवालातून दिसून येत असून तो मतपेढीनं प्रेरित आणि पूर्वग्रहदूषित असल्याचं दिसत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच...

June 29, 2024 10:51 AM

views 24

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. कडवंची गावाजवळ दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात...

June 29, 2024 10:34 AM

views 32

देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली याराज्यांमधे मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल,झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडचा भाग आणि उत्तराखंडच्या काही भागातहीमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.   कोकण, मध्य महाराष्ट्रासह ह...

June 29, 2024 10:30 AM

views 38

मंगोलियात सत्ताधारी पक्ष मंगोलियन पीपल्स पार्टीनं संसदीय निवडणुकीत विजय

मंगोलियात सत्ताधारी पक्ष मंगोलियन पीपल्स पार्टीनं संसदीय निवडणुकीत विजय मिळवला आहे. प्रारंभिक निकालांनुसार १२६ पैकी किमान ६८ जागा आपल्या पक्षाला मिळाल्या आहेत, असं पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान ओयन एर्देन लुसानमस्राई यांनी वार्ताहरांना सांगितलं. कागदी मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर निवडणुकीचे अधिकृत ...

June 29, 2024 10:24 AM

views 26

पुण्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

पुण्यातील अमली पदार्थ सेवन प्रकरणी पोलिसांनी तीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यातील एकजण नायजेरियन तर दोन पुण्यातील आहेत. यातल्या एका आरोपीने L3 हॉटेलच्या पार्टीमध्ये ड्रग्स पुरवले होते. L3 बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.  

June 29, 2024 10:11 AM

views 31

केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेतील तरतुदींमध्ये बदल

केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेतील तरतुदींमध्ये बदल केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा सहा महिन्यांपेक्षा कमी राहिली आहे, त्यांनाही या योजनेतील विथड्रॉअल बेनिफिट म्हणजे रक्कम काढण्याची सुविधा त्यामुळे मिळणार आहे. सेवा पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा कमी काळ असताना या योजनेतून बाह...

June 29, 2024 10:03 AM

views 27

योगाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याचा निर्णय – मनसुख मांडवीय

योगाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याच्या निर्णयाचं केंद्रिय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी स्वागत केलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर पी टी उषा यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं पत्र त्यांनी आशियाई ऑलिम्पिक मंडळाचे अध्यक्ष राजा रणधीर सिंग यांना नुकतंच ...

June 29, 2024 9:48 AM

views 42

बनावट सिमचा वापर करून मोबाईल क्रमांकांचं हस्तांतर करण्याला आळा बसणार

'दूरसंचार मोबाईल क्रमांक हस्तांतर नियमन नववी दुरुस्ती २०२४' हा कायदा एक जुलैपासून अमलात येणार आहे. त्या अंतर्गत बनावट सिमचा वापर करून किंवा ते बदलून मोबाईल क्रमांकांचं हस्तांतर करण्याला आळा घालण्यात येणार आहे. युनिक पोर्टिंग कोड किंवा यूपीसी म्हणजे विशेष हस्तांतर क्रमांकासाठीची विनंती नाकारण्याची सु...

June 29, 2024 9:44 AM

views 54

नागरी विमानवाहतुकीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

देशांतर्गत विमानवाहतुकीत भारत जगातील तिसरा देश ठरला आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतानं हा मान मिळवला आहे. ऑफिशिअल एअरलाइन गाइड म्हणजे ओएजी या विमानवाहतुकीबाबत विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं ही माहिती दिली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, इंडिगो आणि एअर इंडियासारख्या कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यात व...