July 1, 2024 3:44 PM

views 34

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक

नीट युजी परीक्षेतल्या गैरप्रकारांसंदर्भात सीबीआयने गुजरातमधे एका खासगी शाळेच्या मालकाला अटक केली आहे. ५ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचं केंद्र या शाळेतही होतं. गुजरात पोलिसांनी यापूर्वी ५ जणांना अटक केली असून नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी किमान २७ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मागणी क...

July 1, 2024 3:42 PM

views 35

नीट फेरपरीक्षेचे निकाल जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेने आज नीटच्या फेरपरीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या १ हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेर परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली. एकूण ८१३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. निकाल एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. &nbs...

July 1, 2024 2:55 PM

views 28

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

यवतमाळ नागपूर महामार्गावर चापरदा गावाजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ४ च्या सुमारास वेगवान इनोव्हा गाडी आणि ट्रकवर धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या इनोव्हा कारमधील प्रवासी पंजाबहून ना...

July 1, 2024 1:53 PM

views 22

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर चर्चा सुरु

संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभारप्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. भाजपा खासदार अनुराग सिंह ठाकुर यांनी केंद्र सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या लोककल्याणकारी योजनांचं आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा उल्लेख केला. भाजपा सरकारच्या काळात २५ कोट...

July 1, 2024 8:06 PM

views 164

३ नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले. ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांची जागा घेणारे हे कायदे संसदेने मागच्या वर्षी संमत केले होते. हे तीन नवे कायदे लागू करण्यापूर्वी सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांशी ...

July 1, 2024 1:45 PM

views 26

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ४ जागांसाठीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या तीन मतदार संघांची मतमोजणी नवीमुंबईत नेरुळ इथं होत असून मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. जळ...

July 1, 2024 5:46 PM

views 32

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाचा सर्वसमावेशक धोरण

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने एक सर्वसमावेशक धोरण ठरवलं असून योग्य प्रक्रिया पूर्ण करून या अधिवेशनात याबाबतचा शासन निर्णय आणला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. आमदार ...

July 1, 2024 3:54 PM

views 29

टेनिस जगतातली प्रतिष्ठेची विंबल्डन स्पर्धा आजपासून रंगणार

हिरवळीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या जगातल्या प्रतिष्ठेच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेला आजपासून लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना एस्टोनियाच्या मार्क लाजेल याच्याबरोबर होणार आहे. भारतीय खेळाडू सुमित नागलचा पुरुष एकेरीचा पहिला सामना सर्बियाच्या ...

July 1, 2024 1:32 PM

views 33

T-२० विश्वचषक विजेत्या पुरुष क्रिकेट संघासाठी बी.सी.सी.आय कडून, १२५ कोटी रुपयांची बक्षीसं जाहीर

टी-२० विश्वचषक चषकाला गवसणी घातलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं १२५ कोटी रुपयांच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री बार्बाडोस मधील भारताच्या विजयानंतर नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी भारतीय खेळाडूंचं अभिनंदान केलं आणि ही घोषणा केली.  

July 1, 2024 1:29 PM

views 23

वर्षा सहली दरम्यान एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळा इथे वर्षा सहलीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जण काल भुशी धरणात वाहून गेले. हे सर्वजण पुण्यातील रहिवासी होते. यात एक महिला आणि चार लहान मुलांचा समावेश आहे. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.