July 2, 2024 3:20 PM

views 28

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी दोन जागा

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात दोन जागांवर महाविकास आघाडी तर दोन जागांवर महायुती विजयी झाली आहे. मुंबईतल्या दोन्ही म्हणजे मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधरमधून...

July 2, 2024 3:38 PM

views 18

महाडच्या चवदार तळ्याच्या सुधारणेसाठी ६५ कोटींच्या प्रस्तावाला १५ दिवसात मंजुरी देण्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावा वरच्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आज विधानसभेत उत्तर देत आहेत.  महाडच्या चवदार तळ्याच्या सुधारणेसाठी ६५ कोटी रूपयांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून  त्याला १५ दिवसात उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देऊन, काम सुरू करू असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज...

July 2, 2024 1:34 PM

views 16

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान भवनात

लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधान भवनात उमटले. भाजप गटनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार यांच्यासह इतरांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. काल विधानपरिषदेत झालेल्या गदारोळावरू...

July 2, 2024 2:53 PM

views 30

संसद सभागृहात सदस्यांनी लोकशाही तत्त्वांचं पालन करण्याचं प्रधानमंत्री मोदी यांचं आवाहन

संसद सभागृहात लोकशाही तत्त्वांचं आणि नियमांचं पालन काटेकोरपणे करावं असं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत केलं, असं रिजिजू म्हणाले. संसदेतले लोकनियुक्त प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर देशसेवेची जबाबदारी असते, यावर प्रधानमंत्र्यांनी बैठकीत भर दिला. पर्यावरण, पाणी, आणि इतर सामाज...

July 2, 2024 1:21 PM

views 24

टी ट्वेंटी : भारताच्या पुरुष संघाची पाच सामन्यांची मालिका झिम्बाब्वे येथे रंगणार

भारताचा पुरुष क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान हरारे इथं ही मालिका होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतानं आपला १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला असून शुभमन गिल याचं नेतृत्व करणार आहे. ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर हे ख...

July 2, 2024 1:13 PM

views 24

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा  अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांमध्ये पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरही मुसळधार पाऊस होईल, असा अंद...

July 2, 2024 1:05 PM

views 27

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी

कथित मद्य घोटाळा प्रकरणी कारागृहात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज न्यायमूर्ती नीना बन्सल क्रिष्णा यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. सीबीआयने आपल्याला अटक करण्यासाठी कोणताही नवा पुरावा सादर केला नाही असं केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आह...

July 2, 2024 1:03 PM

views 31

२३ वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ८ पदकं जिंकत भारत अग्रस्थानी

जॉर्डन इथं सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत २३ वर्षांखालच्या वयोगटात भारतीय कुस्तीपटूंनी ८ पदकं जिंकून अव्वल स्थान पटकावलं आहे.  यात चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या ७० किलो वजनी गटात अभिमन्यू याने, ९२ किलो गटात जॉन्टी कुमारी, ९७ किलो गटात साहिल ज...

July 2, 2024 10:20 AM

views 16

यूपीएससी : नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४चे निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ चे निकाल काल जाहीर केले. जे उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी पुन्हा एकदा तपशीलवार अर्ज करावे लागणार आहेत. आयोगाच्या वेबसाइटवर याबाबतचे तपशील आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

July 2, 2024 10:15 AM

views 25

हंगेरीला सहा महिन्यांसाठी युरोपीय महासंघाचं अध्यक्षपद

हंगेरीला सहा महिन्यांसाठी युरोपीय महासंघाचं अध्यक्षपद मिळालं आहे. आपल्या देशाच्या अध्यक्षपदाच्या काळात या महासंघाची स्पर्धात्मकता वाढवणं, संरक्षण धोरण बळकट करणं, बेकायदा स्थलांतर रोखणं आदी गोष्टींना प्राधान्य राहील असं हंगेरीचे युरोपीय महासंघ मंत्री जॅनोस बोका यांनी सांगितलं.