July 2, 2024 8:19 PM

views 17

अँडी मरेची विम्बल्डन पुरुष एकेरीच्या स्पर्धेतून माघार

दोन वेळा विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं जेतेपद मिळवणाऱ्या अँडी मरे यानं दुखापतीमुळे यंदा विम्बल्डनमधे पुरूष दुहेरीतून माघार घेतली आहे. मात्र तो जेमी रॉबर्ट मरे या आपल्या भावाच्या साथीने तो पुरूष दुहेरीत  खेळणाच्या विचारात आहे. कालपासून सुरू झालेल्या या  स्पर्धेचा समारोप १४ जुलैला होईल.

July 2, 2024 8:16 PM

views 20

जाफना जिल्ह्यात 934 रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पांना श्रीलंका सरकारची मंजुरी

भारत सरकारच्या मदतीनं श्रीलंकेच्या जाफना जिल्ह्यात ९३४ रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पांना श्रीलंकेच्या सरकारनं मंजुरी दिली आहे. श्रीलंकेच्या व्यवस्थापनानं ही माहिती दिली. जानेवारी २०१७ मध्ये दोन्ही देशांनी या संदर्भात सामंजस्य करार केला होता. या प्रकल्पांतर्गत जवळपास ३ हजार रेन वॉटर हार्वेस्टिंग ...

July 2, 2024 8:13 PM

views 27

ब्राझीलच्या रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे किमान १७९ लोकांचा मृत्यू

ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे किमान १७९ लोक मरण पावले आणि ३३ लोक अद्याप बेपत्ता आहेत. राज्याच्या नागरी संरक्षण संस्थेनं ही माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांत, विपरित हवामानामुळे २ पूर्णांक ३९ दशलक्षाहून अधिक रहिवासी प्रभावित झाले आणि ४ लाख ५० हजारांहून अधिक ल...

July 3, 2024 9:46 AM

views 19

भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांचं उत्पन्न

भारतीय रेल्वेनं या वर्षी जूनमध्ये मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी जास्त आहे. रेल्वे मंत्रालयानं आज ही माहिती दिली. गेल्या वर्षी याच महिन्यात सुमारे १२३ दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत या वर्षी जूनमध्ये १३५ दशलक्ष टनांपेक्षा जास्त म...

July 2, 2024 8:03 PM

views 30

कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी नवी दिल्लीत आढावा बैठक

कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, एम. नागराजू यांनी सध्या उत्पादन करणाऱ्या, उत्पादन वाढवू शकतात अशा आणि कार्यान्वीत नसलेल्या कोळसा खाणींचा नवी दिल्लीतल्या बैठकीत आढावा घेतला. कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत, ५४ बंदिस्त ...

July 2, 2024 7:59 PM

views 30

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेचं कामकाज आज संस्थगित झालं. २४ जूनला सुरु झालेलं हे कामकाज उद्या संपणार होतं. मात्र आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा सभापती ओम बिर्ला यांनी केली.

July 2, 2024 7:51 PM

views 20

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक

महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक केली. हा प्रवासी बँकाॅकहून मुंबईला आला होता. या प्रवाशाकडे ५ कोटी रुपये किंमतीचे गांजा सदृश अंमली पदार्थ सापडले. या प्रवाशावर अंमली पदार्थ प्रतिंबधीत कायद्याखाली गुन्...

July 2, 2024 7:37 PM

views 24

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचं आयोजन

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्यांनी https://www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत असं आ...

July 2, 2024 7:30 PM

views 34

नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरात दाखल

नैर्ऋत्य मोसमी पावसाने आता पूर्ण देश व्यापला असून येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील. विदर्भात पाऊस आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच...

July 2, 2024 7:27 PM

views 27

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२४ ला विधानपरिषदेत मंजुरी

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२४ ला आज विधानपरिषदेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी तालुका पातळीवर तीन अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यां...