July 3, 2024 3:31 PM

views 31

वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल. तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. विधी मंडळाच्या आवारात आज ते वार्ताहरांशी बोलत होते.  

July 3, 2024 2:40 PM

views 46

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : भारताचे रोहन बोपण्णा, सुमित नागल पुरुष दुहेरीचे सामने खेळणार

लंडन इथं सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एबडेन यांचा सामना आज संध्याकाळी जिओव्हानी मपेत्शी पेरिकार्ड आणि ॲड्रिन मॅनरिनो यांच्याशी होणार आहे. तसंच, भारताच्या सुमित नागल आणि सर्बियाचा दुसान लाजोविच यांची लढत देखील आज संध्याकाळी पेद्रो मा...

July 3, 2024 2:36 PM

views 24

कॅरिबियन भागात बेरील चक्रीवादळामुळे सहा लोकांचा बळी

कॅरिबियन भागात धडकलेल्या बेरील चक्रीवादळामुळे सहा लोकांचा बळी गेला असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे चक्रीवादळ श्रेणी ४ प्रकारचं असून ते ताशी १५५ मैल वेगानं जमैकाच्या दिशेने जात असल्याचं राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानं सांगितलं आहे. त्यामुळे आज जमैका आणि केमनबेटांच्या काही भागांमध्ये वेगवान...

July 3, 2024 7:33 PM

views 36

शेअर बाजार निर्देशांकानं ओलांडली ८० हजारांची उच्चांकी पातळी

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज व्यवहार सुरु होतानाच जोरदार उसळी घेत विक्रमी ८० हजारांचा टप्पा पार केला. शेअर बाजाराची ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी आहे. सेंसेक्स ५७२ पूर्णांक ३२ अंकांच्या वाढीसह ८० हजार १३ अंकांवर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील १६७ अंकांच्या वाढीसह २४ हजार २९१...

July 3, 2024 2:29 PM

views 17

भारताच्या पहिल्या सौर यान आदित्य एल-1ची एल-1 बिंदू भोवतीची पहिली प्रभामंडळ प्रदक्षिणा पूर्ण

भारताच्या पहिल्या सौर मोहिमेअंतर्गत प्रक्षेपित केलेल्या आदित्य एल वन यानानं अंतराळात पृथ्वी आणि सूर्य यांच्यातल्या लॅग्रेंज पॉइंट एल वन  इथं आपली पहिली प्रभामंडळ प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. आदित्य एल वन नं आपल्या दुसऱ्या प्रभामंडळ कक्षेतलं स्थानांतरण यशस्वीरीत्या केल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था,...

July 3, 2024 1:37 PM

views 9

हाथरस इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांना राज्यसभेत आदरांजली

राज्यसभेचं  आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेशात हाथरस इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांना आदरांजली वाहण्यात आली. या घटनेतील जखमींना वैद्यकीय मदत देण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दिली.    ...

July 3, 2024 3:46 PM

views 30

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपये मदतीची पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी, केंद्र सरकारनं नमूद केलेल्या नव्या दरानं हो...

July 3, 2024 1:43 PM

views 21

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणं हा भारताचा दृष्टिकोन – मंत्री अश्विनी वैष्णव

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा वापर करून तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणं, हा भारताचा दृष्टिकोन असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेला प्रारंभ झाला, त्यावेळी ...

July 3, 2024 3:58 PM

views 26

निलंबनाचा फेरविचार करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपसभापतींना पत्राद्वारे विनंती

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल निलंबित झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफी मागितली आहे.आपल्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंतीही त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्राद्वारे केली आहे. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले...

July 3, 2024 12:17 PM

views 21

विधानपरिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात अंमली पदार्थ आढळल्याचा मुद्दा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मे महिन्यात अंमली पदार्थ आढळून आल्याचा मुद्दा आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. हा प्रश्न राज्यातल्या सर्व शासकीय महाविद्यालयांच्या सुरक्षिततेचा असल्याचं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं. तसेच, सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या ...