June 13, 2024 7:28 PM June 13, 2024 7:28 PM

views 38

मनोज जरांगेंच उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी इथं सुरू असलेलं आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मंत्री शंभुराज देसाई, संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.   सरकार सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून यावर एका महिन्यात नि...

June 13, 2024 9:13 PM June 13, 2024 9:13 PM

views 10

नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले ग्रेस मार्क रद्द

नीट परीक्षेतल्या १ हजार ५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ग्रेस मार्कशिवाय मिळालेले गुण या विद्यार्थ्यांना कळवले जातील आणि त्यांना २३ जून रोजी पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ज्य...

June 13, 2024 9:10 PM June 13, 2024 9:10 PM

views 80

राज्यसभेसाठी बिनविरोध निवडून येण्याचा सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा

राज्यसभा निवडणुकीसाठी बिनविरोध निवडून येण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्याशिवाय इतर कुणीही अर्ज भरलेला नाही. उद्या अर्जाची छाननी होईल, त्यानंतर त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होऊ शकते.  प्रफुल्ल पटेल यांनी कालावध...

June 13, 2024 4:45 PM June 13, 2024 4:45 PM

views 55

पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इटली इथं सुरु असलेल्या पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं काल पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उप उपांत्यपूर्व फेरीत त्यानं ॲलेसेंड्रो जियानेसीचा ०-६, ७-५, ७-६ असा पराभव केला. आज संध्याकाळी पुरुष दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा जर्...

June 13, 2024 4:38 PM June 13, 2024 4:38 PM

views 43

एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. महामंडळानं आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना ...

June 13, 2024 8:22 PM June 13, 2024 8:22 PM

views 62

कुवेत : इमारतीला लागलेल्या आगीत ४५ भारतीय कामगारांचा मृत्यू

कुवेतच्या मानगाफ परिसरातल्या इमारतीला काल लागलेल्या आगीत ४५ भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये केरळच्या २४ कामगारांचा समावेश आहे. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये तसंच जखमींना एक लाख रुपये देण्य़ाची घोषणा केरळ सरकारनं आज केली आहे. केंद्रीय परराष्...

June 13, 2024 9:16 PM June 13, 2024 9:16 PM

views 32

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी-शिखर परिषदेसाठी ईटलीला रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज ईटलीला रवाना झाले. भारत-इटली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी तसंच भारत-प्रशांत आणि भूमध्यसागरीय प्रदेशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीला जाण्यापूर्वी दिलं.   इटलीच...