November 9, 2025 9:00 AM

views 43

गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल – मुख्यमंत्र्यांचा विश्वास

आरोग्य व्यवस्था भक्कम झाल्यामुळं गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अहेरी इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ ...

November 8, 2025 8:18 PM

views 42

आशिया चषक स्पर्धेच्या चषकासंबंधीचा वाद संपवण्याची दोन्ही बाजूंची तयारी

नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या चषकासंबंधीचा वाद संपवण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दाखवली आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी दिली आहे. दुबई इथं झालेल्या आयसीसी मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याशी याबाबत...

November 8, 2025 8:12 PM

views 39

Bangladesh: ढाकामध्ये हिंसाचारात १२० जण जखमी

बांग्लादेशाची राजधानी ढाकामध्ये आज आंदोलनकारी शिक्षक आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसाचारात १२० जण जखमी झाले. वेतन आणि पदोन्नती प्रक्रियेत मोठ्या बदलांची मागणी करत प्राथमिक शिक्षकांनी उद्यापासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्यानंतर शिक्षकांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवण्याच...

November 8, 2025 8:09 PM

views 35

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात १० ठार, २८ जखमी

रशियानं मध्यरात्री युक्रेनवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात १० जण ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या तीन प्रातांमध्ये महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांना फटका बसला आहे. रशियानं साडेचारशेपेक्षा जास्त ड्रोन्स आणि ४५ क्षेपणास्त्रं डागल्याची माहिती युक्रेनचे अध्यक...

November 8, 2025 8:06 PM

views 35

न्यूझीलंडबरोबर मुक्त व्यापार करारासंदर्भातल्या चर्चेची चौथी फेरी पूर्ण

न्यूझीलंडबरोबर मुक्त व्यापार करारासंदर्भातल्या चर्चेची चौथी फेरी आज पूर्ण झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक क्ले यांनी या वाटाघाटींबद्दल समाधान व्यक्त केलं. या करारामुळे उभयपक्षी व्यापार, गुंतवणूक, पुरवठा साखळी आणि बाजारपेठेची उपलब्धता यांना चा...

November 8, 2025 8:18 PM

views 45

न्यायाची भाषा नागरिकांना सहज समजण्याइतकी सोपी असावी – प्रधानमंत्री

न्यायाची भाषा ही सामान्य नागरिकांना सहज समजण्याइतकी सोपी असावी, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं. नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर मदत पोचवण्याची प्रक्रिया बळकट करण्याविषयीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. न्यायदानाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकार ...

November 8, 2025 7:58 PM

views 29

पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात ६ नागरिकांचा मृत्यू

अफगाणिस्तान मधल्या  कंधार प्रांतातल्या  बोल्दाक इथं पाकिस्ताननं आज केलेल्या हल्ल्यात सहा नागरिक मृत्युमुखी पडले,  तर पाच जण जखमी झाले. या भागात पाकिस्ताननं डागलेल्या तोफांमुळे काही घरांचं आणि व्यावसायिक आस्थापनांचं देखील नुकसान झालं. पाकिस्ताननं युद्धविरामाचं  उल्लंघन केल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केल...

November 8, 2025 7:55 PM

views 31

अमेरिकेत विमानसेवा विस्कळीत!

अमेरिकेत सरकारी कामकाज बंद पडल्याचा परिणाम म्हणून ५ हजारापेक्षा जास्त विमान उड्डाणं विलंबाने होत आहेत किंवा रद्द झाली आहेत. पुरेशा मनुष्यबळाअभावी हवाई वाहतूक मंत्रालयाने न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, शिकागो, आणि वॉशिंग्टन डीसी इथून निघणाऱ्या विमान उड्डाणांमधे ४ टक्के कपात केली आहे. शटडाऊन सुरुच राहीला तर ...

November 8, 2025 8:18 PM

views 111

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रमुख प्रचारकांची संख्या दुप्पट

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रचारकांची संख्या २० वरून वाढवून ४० करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून विविध पक्षांकडून ही मागणी होत होती. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.

November 8, 2025 7:56 PM

views 32

पंजाबमध्ये पोटनिवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना निलंबनाचे आदेश

पंजाबमध्ये पोटनिवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक रवजोत कौर गरेवाल यांना निलंबित करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.  पंजाबमधल्या तरन तारन मतदारसंघात ११ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत गरेवाल हे आम आदमी पार्टीला मदत करण्यासाठी हस्तक्षेप करत असल्याची तक्रार शिरोमण...