July 6, 2024 6:05 PM

views 26

चीनच्या हेझ शहरात झालेल्या वादळामुळे पाच जणांचा मृत्यु तर ८८ जण जखमी

चीनच्या शॅडोन्ग परगण्यातल्या हेझ शहरात झालेल्या जोरदार वादळामुळे पाचजण मृत्युमुखी पडले तर ८८ जण जखमी झाले. डोन्गमिन्ग आणि ज्युआनचेंग या भागांना वादळाचा तडाखा बसल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. यात २ हजार ८२० घरांची पडझड झाली तर ४ हजार ६० हेक्टर पिकं आणि ४८ वीजपुरवठा केंद्राचं नुकसान झालं. नुकसानी...

July 6, 2024 4:27 PM

views 21

राज्यातल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम करण्यासाठी शासन वचनबद्ध – मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यातल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सोलापुरातल्या अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या कृतज्ञता मेळाव्यात ते आज बोलत होते. महिलांनी स्वावलंबी व्हावं यासाठी शासन...

July 6, 2024 3:14 PM

views 44

विम्बल्डन टेनिस स्पर्धेतला पुरुष दुहेरी सामना आज संध्याकाळी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेतल्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन यांचा सामना जर्मनीच्या हेंड्रिक जीबीन्स आणि कॉन्स्टॅनटिन फ्रॅन्टझन यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे.   रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडन यांच्या जोडीने रॉबीन हस आणि सँडर अॅरेंड्स यांना ७-५, ६-...

July 6, 2024 2:58 PM

views 25

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे क्रिकेट सामना आज हरारे इथं होणार

भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार भारत विरुद्ध झिम्‍बाब्‍वे होत असलेल्या पाच टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज झिम्‍बाब्‍वेत हरारे इथं होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत...

July 6, 2024 2:53 PM

views 17

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत देशातल्या ५०० तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्...

July 6, 2024 1:41 PM

views 8

NBEMSद्वारे घेतली जाणारी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा आज होत आहे

NBEMS अर्थात वैद्यकशास्त्र राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाणारी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा आज होत आहे. परदेशातून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना भारतात वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. देशभरात ५० शहरातल्या ७१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.   कोणताह...

July 6, 2024 1:33 PM

views 12

काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या दौऱ्यावर

काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून ते अहमदाबादमधे पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. याशिवाय ते राजकोट इथं क्रीडासंकुल आग दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. तसंच पोलिस कोठडीत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनाही भेटतील.   लोकसभेत राहुल ...

July 6, 2024 1:27 PM

views 27

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त आदरांजली वाहिली. डॉ. मुखर्जी यांनी देशाला अभिमान वाटेल असं कार्य केलं. त्यांनी मातृभूमीसाठी केलेला त्याग आणि बलिदान यांमुळे देशवासियांना प्रेरणा मिळ...

July 6, 2024 1:17 PM

views 27

इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी आरोग्य मंत्री मसूद पेजस्कियान विजयी

इराणच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी आरोग्य मंत्री मसूद पेजस्कियान हे विजयी झाले आहेत. मतदानाच्या काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना तीन कोटी मतांपैकी एक कोटी साठ लाख मतं पडली. २८ जून रोजी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पेजस्कियान यांना एकूण मतांपैकी ४२ पूर्णांक सहा दशांश टक्के मतं पडली होती, त...

July 6, 2024 1:04 PM

views 39

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ४ दिवस ओदिशा दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत. त्या उद्या पुरी इथं भगवान जगन्नाथ, भगवान बालभद्र, सुभद्रा देवी आणि भगवान सुदर्शन यांच्या रथ यात्रेत सहभागी होणार आहेत. त्या आज संध्याकाळी भुवनेश्वर इथं उत्कलमणी गोपालबंधू दास यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणा...