June 14, 2024 8:45 AM June 14, 2024 8:45 AM

views 18

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल मागे घेतलं. सरकारी शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार राणा जगजितसिं...

June 13, 2024 9:14 PM June 13, 2024 9:14 PM

views 10

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल, तर प्रधानमंंत्र्याच्या प्रधान सचिवपदी पी. के. मिश्रा यांची फेरनियुक्ती

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल, तर प्रधानमंंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारी डॉक्टर पी. के. मिश्रा यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं आज या नियुक्त्यांना मंजुरी दिली. डोवाल आणि मिश्रा यांच्या नियुक्तीचा कालावधी पुढच्या आदेश...

June 13, 2024 8:59 PM June 13, 2024 8:59 PM

views 3

दिल्लीला पाणीपुरवठा करण्याचे अप्पर युमना नदी बोर्डाला निर्देश

दिल्लीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज अप्पर यमुना नदी बोर्डाला दिल्लीला पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली सरकारनं मानवतावादी दृष्टिकोनातून पाणीपुरवठ्याबाबत यमुना नदी बोर्डाकडे विनंती अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. हिमाचल प्रदेशनं आपल्या पूर्वीच्या भूमिकेपासून घुमजाव करून १...

June 13, 2024 8:53 PM June 13, 2024 8:53 PM

views 10

ओडिशामध्ये टपाल विभागात भरती प्रकरणी सीबीआय चौकशी

ओडिशामध्ये टपाल विभागात भरतीसाठी कथित खोटी प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी सीबीआयनं विस्तृत चौकशी सुरू केली आहे. कालाहंडी, नुआपाडा, रायगडा, नबरंगपूर, कंधमाल, केओंझार, मयूरभंज, बालासोर आणि भद्रक यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ६७ हून अधिक ठिकाणी चौकशी सुरू केली आहे. ही प्रमाणपत्रं अलाहाबादच्या माध...

June 13, 2024 8:41 PM June 13, 2024 8:41 PM

views 27

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यातील ४ दहशतवाद्यांची रेखाचित्र जारी

जम्मू काश्मीर मधल्या दोडा जिल्ह्यातल्या गंडोहच्या कोटा टॉप भागात  सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. काल रात्री झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी या भागात लपून बसलेल्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रं जारी केली आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यांना ५ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

June 13, 2024 8:33 PM June 13, 2024 8:33 PM

views 9

यूपीएससी परीक्षा १६ जूनला होणार

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा - २०२४ येत्या १६ जूनला होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी एकूण १४ हजार ५०९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.   दोन सत्रांत होणाऱ्या या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा कें...

June 13, 2024 9:12 PM June 13, 2024 9:12 PM

views 15

१ जुलैपासून लागू होणाऱ्या नव्या कायद्यांबाबत जाणून घेण्यासाठी मोबाईल ॲप उपलब्ध

देशात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम १ जुलैपासून लागू केले जाणार आहेत. नव्या कायद्यांबाबत जाणून घेण्यासाठी “NCRB Sankalan of Criminal Laws” हे मोबाईल ॲप, गुगल प्लेस्टोअरवर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. सामान्य नागरिक, न्यायालयातले अधिकारी, वकील, कायद्याच...

June 13, 2024 7:52 PM June 13, 2024 7:52 PM

views 34

राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती

नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.    येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.   गेल्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच...

June 13, 2024 7:45 PM June 13, 2024 7:45 PM

views 37

‘घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील’

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचं  मदत आणि  पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज सांगितलं. या दुर्घटनेतील १७ मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये आणि राज्य ...

June 13, 2024 7:37 PM June 13, 2024 7:37 PM

views 9

१८ व्या ‘मिफ’ महोत्सवात २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश

मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा २१ मराठी चित्रपट, लघुपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात प्रेक्षकांना या चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.   आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सार्वनिक कौर यांचा अगेन्स्ट द टाइड हा चित्रपट आहे. तर राष्ट्रीय स्पर्धेत बिगार...