July 7, 2024 6:27 PM

views 29

कुस्तीपटू विनेश फोगटला स्पेन ग्रांप्रीमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक

स्पेनच्या माद्रिद इथं ग्रां प्री ऑफ स्पेन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगटनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत फोगटनं रशियाच्या मारिया ट्युमेरेकोव्हावर १०-५ अशी मात केली.    विनेश आता पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी २० दिवसीय प्रशिक्षणासाठी फ्रान्सला रवाना...

July 7, 2024 6:04 PM

views 26

पुण्यात झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण

पुणे शहरात झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात राहणारी ४२ वर्षीय महिला आणि खराडीची रहिवासी असलेली २२ वर्षीय तरुणी यांना झिकाची लागण झाल्याचं आढळून आल्याने शहरातल्या झिका संसर्गबाधितांची संख्या १२वर गेली आहे.

July 7, 2024 7:11 PM

views 19

भविष्यातील तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञान कौशल्य विकसित करा – मंत्री  नितीन गडकरी

आपल्या प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणतं तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करा, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना केलं आहे.   विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएश...

July 7, 2024 6:56 PM

views 29

वरळी इथं झालेल्या हिट अँड रन प्रकरणी योग्य कारवाई होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईतल्या वरळी इथल्या हिट अँड रन प्रकरणातील कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. कायदा सर्वांसाठी समान असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.    वरळीत आज पहाटे साडे पाचच्या सुमारास दुचाकीवरून जाणा...

July 7, 2024 3:13 PM

views 22

स्केटिंगपटू असित कांबळेचा १०० मीटर स्केटिंगमध्ये विश्वविक्रम

बेळगाव इथं आयोजित गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड स्पर्धेत असित कांबळे या स्केटिंगपटूनं १०० मीटर स्केटिंगमध्ये विश्वविक्रम रचला आहे. असित यानं दोन चाकांच्या पाठमोऱ्या स्केटिंग प्रकारात १०० मीटर अंतर केवळ १४ पूर्णांक ८४ शतांश सेकंदांमध्ये पूर्ण करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या नावाची नोंद केली.

July 7, 2024 3:09 PM

views 21

गडचिरोली जिल्ह्यात संपूर्णता अभियानाला शुभारंभ

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड या आकांक्षित तालुक्यात काल संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली. अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढली. तसंच महिला आणि बालकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोषण आहाराचे स्टॉल लावून त्यासंबंधी माहिती दिली.

July 7, 2024 3:04 PM

views 26

राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी

राज्याच्या बहुतांश भागात पावसानं काल आणि आज हजेरी लावली आहे. नवी मुंबईत पावसामुळं रबाळे एमआयडीसी भागात डोंगरावरचे मोठे दगड खाली कोसळले आहेत. या भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं प्रत्येकी एक पथक ठाणे, कुर्ला, घाटकोपर ...

July 7, 2024 2:59 PM

views 35

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी मिळणार – उद्योगमंत्री चंद्रकांत पाटील

ऐतिहासिक वारसा असलेल्या सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपाययोजना आखण्याचं, आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पाटील यांनी काल सोलापूरच्या जिल्हा नियोजन मंडळासोबत बैठक घेतली, त...

July 7, 2024 3:14 PM

views 24

राज्यात योजनांची अतिवृष्टी असून अंमलबजावणीचा दुष्काळ – उद्धव ठाकरे

राज्यात योजनांची अतिवृष्टी असून अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. सरकारनं शेतकऱ्याला हमीभाव आणि कर्जमाफी दिली नाही,  आरक्षणावर तोडगा काढला नाही, अशी टीका त्यांनी केली.

July 7, 2024 2:15 PM

views 30

फ्रान्समध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान

फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. विद्यमान संसदेचा तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असतानाच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ९ जून रोजी संसद विसर्जित करून मद्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे.   पहिल्या टप्प्यात मरीन ले पेन यांच्या नॅशनल रॅली या उजव्या विचारसरण...