July 7, 2024 7:39 PM

views 23

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय  नुकताच पूर्ण झाला. या बैठकांच्या सत्रात  संबंधित १० गटांमधले १२० हून अधिक निमंत्रित, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ सहभागी झाले होते. तसंच कामगार स...

July 7, 2024 8:38 PM

views 50

ओदिशात जगन्नाथ रथयात्रेला सुरूवात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही उपस्थिती

ओडिशात,भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला आज संध्याकाळी पुरी शहरात सुरुवात झाली. भगवान जगन्नाथ रथ ज्या रस्त्यावरून ओढला जाणार आहे तिथं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वार्षिक उत्सवात सामील सहभागी झाल्या आहे...

July 7, 2024 7:23 PM

views 28

बिलियर्ड्स : भारताच्या ध्रुव सितवालाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं

बिलियर्ड्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद भारताच्या ध्रुव सितवाला यानं आपल्या नावावर केलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं भारतात्याच पंकज अडवाणीवर ५-२ अशी मात केली. या पराभवामुळे या स्पर्धेचं जेतेपद सलग तिसऱ्यांदा मिळवण्याची पंकज अडवाणीची संधी हुकली आहे.

July 7, 2024 7:14 PM

views 29

आशियाई दुहेरी स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा : भारताच्या अभय सिंहची पुरुष आणि मिश्र दुहेरी दोन्ही प्रकारांमध्ये अजिंक्यपदाला गवसणी

आशियाई दुहेरी स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताच्या अभय सिंह यानं पुरुष आणि मिश्र दुहेरी अशा दोन्ही प्रकारांमध्ये अजिंक्यपदाला गवसणी घातली. पुरुष दुहेरीत वेलावन सेंथिलकुमार याच्या साथीनं त्यानं मलेशियाच्या ओंग साइ हुंग आणि स्याफीक कमल या जोडीवर ११-४, ११-५ असा सहज विजय मिळवला. तर पुरुष दुहेरीत त्या...

July 7, 2024 7:08 PM

views 19

नाशिकमध्ये सुपर फिफ्टी उपक्रमातंर्गंत ५० विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिकच्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सुपर फिफ्टी उपक्रमातंर्गंत निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांचा आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गंत या गुणवंत विद्यार्थ्यांच्या अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाचा खर्च करतानाच त्य...

July 7, 2024 7:05 PM

views 24

नाशिकच्या पंचवटीत भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रा

नाशिकच्या पंचवटीत आज भगवान श्री जगन्नाथ  रथ यात्रा काढण्यात आली. त्यावेळी पुरुष भाविकांसह शेकडो महिला भाविकांनीही रथ ओढला.  यात्रेतून धर्माचं तसंच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जलरक्षा नदी सुरक्षा पर्यावरण बचाव, वृक्ष वाटप करत पर्यावरण बचाव अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली.

July 7, 2024 6:59 PM

views 19

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक वसंत डहाके

नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक वसंत अबाजी डहाके यांची निवड झाली आहे. प्रतिष्ठानची वार्षिक सभा आज नाशिकमध्ये  झाली, त्यात डहाके यांची निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे नवीन विश्वस्त म्हणून ज्येष्ठ समिक्षक दिलीप धोंडगे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, लेखिका सं...

July 7, 2024 6:55 PM

views 25

कोल्हापूर : नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतून गोरगरीबांना आरोग्य सेवा देण्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन

पंधराव्या वित्त आयोगातून उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतून शहरातल्या गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा सुविधा देण्याचं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात केलं. कोल्हापूर महापालिकेच्यावतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या तीन नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन पालकमंत्र...

July 7, 2024 7:09 PM

views 24

वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ – ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली वीज कंपन्यांतल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथी गृहात ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालच्या वीज कंपन्यांतल्या अधिकारी...

July 7, 2024 6:38 PM

views 17

ठाणे : जांभळी नाक्याजवळील पांडे हाऊस इमारतीचा जीर्ण भाग कोसळला

ठाणे शहरातल्या जांभळी नाक्याजवळच्या कडवा गल्लीतल्या पांडे हाऊस या धोकादायक इमारतीचा जीर्ण भाग आज सकाळी दहाच्या सुमाराला कोसळला. ही इमारत नव्वद वर्ष जुनी होती, आणि जीर्ण झालेली असल्यानं रिकामी केलेली होती. त्यामुळं सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागान...