July 8, 2024 11:00 AM

views 25

उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या 4-5 दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसंच ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशात; मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात आज, आणि 10-11 तारखेलाही तुरळक ठिकाणी, अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊ...

July 8, 2024 10:58 AM

views 18

महिला क्रिकेट : भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवरचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तत्पूर्वी, फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावत 177 धावा केल्या होत्या. तझमिन ब्रिट्सने सर्वाधिक 52 धावा 39 चेंडूत केल्या, तर एनेक बॉशने 32 चेंड...

July 8, 2024 10:46 AM

views 27

अमली पदार्थांचा वापर करुन दहशतवादाला बळ देणाऱ्या फरार आरोपीला एनआयएकडून अटक

जम्मू आणि काश्मीरमधील अमली पदार्थांच्या वापर करुन दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटातील प्रमुख फरार आरोपीला राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA नं काल अटक केली. सय्यद सलीम जहांगीर अंद्राबी उर्फ सलीम अंद्राबी जून 2020 पासून फरार होता. या अटकेमुळे नार्को-दहशतवाद संबंध नष्ट करण्याच्या आणि भारतात अमली पदार्थांच...

July 8, 2024 1:36 PM

views 30

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.   मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात काल सकाळी जोरदार प...

July 7, 2024 8:29 PM

views 25

के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची बसपा पक्षप्रमुख मायावती यांची मागणी

बहुजन समाज पार्टीचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. चेन्नई इथं आर्मस्ट्राँग यांच्या पार्थिवाला पुष्पांजली वाहिल्यानंतर त्या बातमीदारांशी बोलत होत्या. राज्यातल्या दुर्बल घटकांचं रक्षण करण्याचं आणि कायदा आणि...

July 7, 2024 8:25 PM

views 13

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा विरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिपणी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेखा शर्मा यांनी केलेल्या तक्रारीनंतर मोईत्रा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या ७९ कलमाअंतर्गंत गुन्ह...

July 7, 2024 8:33 PM

views 29

झिम्बाव्वे विरोधातल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा १०० धावांनी विजय

भारत आणि झिम्बाव्वे यांच्यात आज झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं १०० धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्मा यानं झळकावलेल्या पहिल्या शतकाच्या जोरावर भारतानं, झिम्बाव्वे समोर विजयासाठी २३५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र १९व...

July 7, 2024 7:57 PM

views 33

लातूर : वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक दिंडीत सहभागी

लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत गेल्या १८ वर्षांपासून आषाढी वारीतल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक पायी दिंडीत सहभागी होत असतं. यावर्षीही हे पथक आजपासून १७ जुलै पर्यंत वारकऱ्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी रवाना झालं आहे. या पथकात विवेकानंद रुग्णालयाचे २ डॉक्टर, ६ ...

July 7, 2024 7:54 PM

views 31

आजपासून पंढरपुरातील श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुले

पंढरपूर इथं आषाढी एकादशी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. भाविकांना आता २६ जुलैपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मीनिटे पदस्पर्श दर्शन घेता येईल, अशी माहिती, मंदिर प्रशासनाचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांन...

July 7, 2024 7:43 PM

views 21

आगामी  विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई – उद्धव ठाकरे

आगामी  विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते.    गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किती घोषणा अंमलात आणल्या, असा ...