July 9, 2024 11:33 AM

views 26

भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा यांचे तीन रथ पुरीच्या श्री गुंडीचा मंदिरात पोहोचले

भगवान जगन्नाथाचा - नंदीघोष, देवी सुभद्रा आणि भगवानसुदर्शन यांचा - देवदालन आणि भगवान बलभद्राचा - तालध्वज हे तीन रथ काल पुरीच्या रस्त्यावर सूर्यास्त झाल्यावर प्रथेनुसार जागेवरच थांबवण्यात आले. आज तिथूनच त्यांच्या मावशी- देवी गुंडीच्या देवीच्या मंदिरात असंख्य भाविक हे रथ पुन्हा पुढे ओढून नेतील. या पवित...

July 9, 2024 11:15 AM

views 22

जपानमध्ये पश्चिम ओगासावारा बेटांवर 6 पूर्णांक3 दशांश अंश तीव्रतेचा भूकंप

जपानमध्ये आज सकाळी पश्चिम ओगासावारा बेटांवर 6 पूर्णांक3 दशांश अंश तीव्रतेचा भूकंप झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार हाभूकंप काल मध्यरात्री 1 वाजून 32 मिनिटांनी झाला. भूकंपाचं केंद्र पश्चिमओगासावारा बेटांवर 530 किलोमीटर खोलीवर, 27 पूर्णांक1 दशांश अंश उत्तर अक्षांश आणि 139 अंशपूर्व रेखांशावर होतं. या भूकं...

July 9, 2024 10:56 AM

views 25

युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार

युक्रेन आणि पोलंड यांच्यात द्विपक्षीय सुरक्षा करार झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी वॉर्सामध्ये काल करारावर सह्या केल्या.   वॉशिंग्टनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नाटोच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा क...

July 9, 2024 10:45 AM

views 22

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी नेमबाज गगन नारंग यांची पथकाचे प्रमुख म्हणून निवड

 भारतीय ऑलिंपिक संघटनेनं पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी नेमबाज गगन नारंग यांची पथकाचे प्रमुख म्हणून निवड केली आहे. २६ तारखेपासून या स्पर्धा सुरू होणार आहेत. मेरी कोम यांची या आधी पथकप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे असमर्थता व्यक्त केल्यामुळे आधी उपपथकप्रमुख म्हणून न...

July 9, 2024 10:32 AM

views 25

नीट युजी पेपरफुटी प्रकरणी अहवाल सादर करण्याचे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला निर्देश

नीट युजी पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत काय पावलं उचलली याची माहिती देणारी प्रतिज्ञापत्रं उद्या संध्याकाळपर्यंत न्यायालयात सादर करावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. तसंच या प्रकरणाच्या तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्याया...

July 8, 2024 8:10 PM

views 21

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी दूरसंचार सुविधांमध्ये सुधारणा

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांना अखंडित मोबाईल सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं तिथल्या दूरसंचार सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करायचं ठरवलं आहे. अपेक्षित सुधारणांमुळं अमरनाथ यात्रेतला  लखनपूर ते काझीगंड तसंच काझीगंड ते पहलगाम आणि बलताल पर्यंतचा पट्टा 2G, 3G आणि  4G  सुविधांनी युक्त होणार आह...

July 8, 2024 8:05 PM

views 11

खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ लाख हेक्टरनं वाढ

खरीप पिकांच्या लागवडीच्या क्षेत्रात यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ लाख हेक्टरनं वाढ झाली आहे. खरीप लागवडीखालचं क्षेत्र गेल्या वर्षी ३३१ लाख हेक्टर इतकं होतं, यंदा ते वाढून ३७८ हेक्टर इतकं झालं आहे. यापैकी ६० लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर ३६ लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड करण्यात ...

July 8, 2024 8:00 PM

views 23

राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एक दिवसीय मणिपूर दौरा केला. यावेळी त्यांनी आसामच्या कचार इथल्या पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिरीबाम जिल्ह्यात आश्रयाला आलेल्या हिंसाचारग्रस्त कुटुंबांशी संवाद साधला. इन्फाळला भेट दिल्यानंतर राहुल गांधी चुराचांदपूरकडे   रवाना झाले. तिथे मदत के...

July 8, 2024 7:54 PM

views 34

झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला मंत्रिमंडळाचा विस्तार

झारखंड राज्याच्या विधानसभेचा विश्वासदर्शक ठराव संमत होताच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळात मावळते मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह अन्य ११ आमदारांचा समावेश आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शप...

July 8, 2024 7:06 PM

views 12

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा आज केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. उंच इमारती तसंच २०० पेक्षा जास्त घरं असलेल्या सहकारी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्याची निवडणूक आयोगाची सूचना आहे. याचा आढावा या बैठकीत झाला. मतदार यादीचं अद्ययावतीकरण, नवीन मतदान केंद्रे उभारणं यासह विविध सूचना ...