July 10, 2024 3:40 PM

views 34

मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडल्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी हौद्यात उतरून प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्...

July 10, 2024 1:15 PM

views 21

रशियन सैन्यात मदतनीस असणाऱ्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी रशियाकडून मान्य

रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी पाठवण्याची भारताची मागणी रशियानं मान्य केली आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी माध्यमांना दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्...

July 10, 2024 1:09 PM

views 30

इस्रायलने गाझापट्टीतल्या शाळेवर केलेल्या हल्ल्यात २५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने गाझापट्टीतल्या एका शाळेवर काल केलेल्या हल्ल्यात २५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. या इमारतीत हजारो स्थलांतरितांनी आश्रय घेतला होता, असं हमासच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.    या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला याची माहिती घेत आहोत, असं इस्रायलच्या लष्कराने म्हटलं आहे. हा हव...

July 10, 2024 1:06 PM

views 23

टपाल विभागातर्फे १०० दिवस देशभरात ५ हजार डाक चौपालचं आयोजन

टपाल विभागातर्फे देशभरात राबवण्यात येणार असलेल्या उपक्रमांचा आढावा दूरसंचार मंत्री जोतीरादित्य शिंदे यांनी काल घेतला. टपाल विभाग आजपासून १०० दिवस देशभरात ५ हजार डाक चौपालचं आयोजन करणार आहे. टपाल खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं काय उपाययोजना करता येतील याबाबत ...

July 10, 2024 1:51 PM

views 44

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांच्याशी व्हिएन्ना इथं भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियातल्या व्हिएन्ना इथं ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांची भेट घेतली. आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहॅमर यांनी स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत-ऑस्ट्रियाची मैत्री आगामी काळात आणखी मजबूत होईल, असंही त्यांनी ...

July 10, 2024 11:43 AM

views 28

विम्बलडन टेनिस स्पर्धा : रशियाच्या डॅनिएल मेदवेदेव उपांत्य फेरीत प्रवेश

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विम्बलडन टेनिस स्पर्धेत डॅनिएल मेदवेदेव यानं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जानिक सिन्नेर याचा 6-7, 6-4, 7-6, 2-6, 6-3 अशा सेटमध्ये पराभव केला. या विजयामुळे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या मोदवेदेवनं स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. येत्या शुक्रवारी जा...

July 10, 2024 10:36 AM

views 18

केंद्रानं खलिस्तानी समर्थक ‘सिख्स फॉर जस्टिस’ संघटनेवरची बंदी ५ वर्षांनी वाढवली

केंद्र सरकारनं खलिस्तानी समर्थक असेलल्या 'सिख्स फॉर जस्टिस' या संघटनेवरची बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत काल ही कारवाई करण्यात आली. भारतानं दहशतवादी म्हणून घोषित केलेला गुरपतवंत सिंग पन्नून अमेरिकेतून चालवत असलेली ही संघटना देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय...

July 10, 2024 10:33 AM

views 20

कोळसा मंत्रालयाच्या फ्लाय अ‍ॅशची विल्हेवाट आणि पुनर्वापरासाठी उपाययोजना

औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून तयार होणाऱ्या फ्लाय ॲश अर्थात राखेची योग्य विल्हेवाट आणि पुनर्निर्मिती करण्यासाठी योग्य दिशेनं पावलं टाकण्यात येत आहे, असं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. यासाठी 13 औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना 19 खाणींच्या मोकळ्या जागा वाटप करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी ...

July 10, 2024 10:17 AM

views 21

खाजगी क्षेत्रातील बँकांनी अधिकाधिक कर्जवाटप करण्याचं वित्त मंत्रालयाचं आवाहन

कुशल कारागीर आणि फेरीवाल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान स्वनिधी, पीएम विश्वकर्मा आणि जन समर्थ पोर्टल यांसारख्या आर्थिक समावेशनाच्या योजनांसाठी खाजगी क्षेत्रातील बँकांनी अधिकाधिक कर्जवाटप करण्याचं आवाहन वित्त मंत्रालयानं केलं आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत काल आर्थिक सेव...

July 10, 2024 3:18 PM

views 23

उत्तरप्रदेश : उन्नाव जिल्ह्यात झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू, १९ जखमी

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या दुधाच्या टँकरला डबल डेकर बसनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.    राष्ट्रप...