July 10, 2024 6:53 PM

views 20

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा रत्नागिरीत नागरी सत्कार

कोकणातील नैसर्गिक उत्पादनांच्या आधारे इथलं उद्योग वाढवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची माझी तयारी आहे. या उद्योगांबरोबरच रिफायनरीसारखे उद्योगही इथं यायला हवेत, असं प्रतिपादन रत्नागिरी-सिंधदुर्गचे  खासदार नारायण राणे यांनी केलं. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर भाजपतर्फे राणे यांचा नागरी सत्कार आज रत्ना...

July 10, 2024 6:46 PM

views 23

डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकार विविध योजना तयार करीत असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

देशभरात डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकार विविध योजना तयार करीत असून राज्यसरकारांबरोबरही संपर्कात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. डेंग्यू विषयी मदत, मार्गदर्शन आणि माहितीसाठी एक विशेष हेल्पलाईन केंद्रीय आरो...

July 10, 2024 5:55 PM

views 30

पालघर शिवसेना उपनेते राजेश शाह यांना शिवसेनेतून काढलं

वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांना शिवसेनेतून काढून टाकलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. या दुर्घटनेत मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबाप्रति सहवेदना व्यक्त करतानाच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं. द...

July 10, 2024 3:16 PM

views 30

ईशान्य आणि पूर्व भारतात दोन ते तीन दिवसांत जोरदार पाऊस

ईशान्य आणि पूर्व भारतात पुढच्या दोन ते तीन दिवसांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि केरळमध्ये पुढच्या चार दिवसात मुसळधार पाऊस पडेल. तर पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार पावसाची स्थिती कायम राहील. उत्त...

July 10, 2024 3:08 PM

views 10

जम्मू काश्मीरमध्ये चकमक झालेल्या ठिकाणी शोधमोहीम

जम्मू काश्मीरमधल्या दोडा जिल्ह्यात संरक्षण दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल चकमक झालेल्या ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. संरक्षण दलाने काल शोधमोहीम सुरू केली होती. पण, अंधार आणि पावसामुळे मोहीम थांबवण्यात आली होती. आज दिवस सुरू होताच संरक्षण दलांच्या जवानांनी पुन्हा जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुर...

July 10, 2024 3:00 PM

views 26

राज्यसरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे – विरोधी पक्षनते अंबादास दानवे

राज्यसरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप आज विधानपरिषदेत विरोधी पक्षनते अंबादास दानवे यांनी केला. नापिकी, कर्जाचा बोजा, पीक विम्यातल्या अडचणी, शेतमालाला बाजारभाव आदी समस्यांमुळे शेतकरी त्रस्त आहे. आणि सरकार केवळ मदतीच्या घोषणा करीत आहे, असं ते म्हणाले.     शेतकऱ्यांचे १० हजार २२ कोटी ६...

July 10, 2024 2:58 PM

views 23

दुधातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

दुधातली भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, आणि पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक निधी देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं.    केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा फायदा एक लाखांहून अधिक अधिकारी आणि कर...

July 10, 2024 1:49 PM

views 26

मराठवाडा आणि विदर्भात पहाटे भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाची तीव्रता साडेचार रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या रामेश्वर तांडा गावात होता. भूकंपामुळे कोणतीही जिव...

July 10, 2024 1:37 PM

views 22

अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

गोव्यातल्या पेडणे इथं अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस तसंच, मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मडगावह...

July 10, 2024 1:34 PM

views 44

देशातल्या सात राज्यांमधल्या १३ विधानसभा मतदारसंघांमधे आज पोटनिवडणुकीसाठी मतदान

देशातल्या सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघांमधे आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि मणिकतला, हिमाचल प्रदेशमधल्या देहरा, हमीरपूर आणि नालागढ तसंच उत्तराखंडमधल्या बद्रीनाथ आणि मंगलौर या मतदारसंघात मतदान होत आहे. तसंच मध्यमप्रदेशमध्ये अमरवाडा, ...