July 12, 2024 3:42 PM

views 21

सोमवारपासून आगारनिहाय “प्रवासी राजा दिन” आणि “कामगार पालक दिन” आयोजित

प्रवासी तसंच कामगारांच्या समस्या आणि तक्रारी स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी येत्या सोमवारपासून आगारनिहाय "प्रवासी राजा दिन" आणि "कामगार पालक दिन" आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत संबधित विभागाचे विभाग नियंत्रक वेळापत्रकानुसार एका आगारात जाऊन सकाळी १० ते २ या सत्रात प्रवाशांच्या लेखी तक्रा...

July 12, 2024 3:34 PM

views 21

औरंगाबाद प्रारूप प्रकरणी इसिसच्या दोन सदस्यांवर आरोपपत्र दाखल

औरंगाबाद प्रारूप प्रकरणी इसिसच्या दोन सदस्यांवर राष्ट्रीय तपास संस्थेनं आज आरोपपत्र दाखल केलं. दहशतवादी कारवाया प्रकरणात सहभाग, देशभरातल्या युवकांची दहशतवाद प्रकरणात सहभागी होण्यासाठी नियुक्ती करण्याचं काम त्यांच्याकडे होतं, असं यात नमूद केलं आहे. फेब्रुवारी महिन्यात यापैकी एका आरोपीला NIA नं पकडलं ...

July 12, 2024 3:28 PM

views 38

राज्याच्या वित्तव्यवस्थेचा २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांचा अहवाल विधानसभेत सादर

मूळ अर्थसंकल्पातल्या तरतुदींइतका खर्च झालेला नसताना राज्य सरकारनं पुरवणी मागण्या मांडल्या. हे प्रकार टाळण्यासाठी योग्य अर्थसंकल्पीय मार्गांचा अवलंब करायला हवा असं निरीक्षण कॅग अर्थात नियंत्रक आणि लेखापालांच्या अहवालात नोंदवलं आहे. राज्याच्या वित्तव्यवस्थेचा २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांचा...

July 12, 2024 2:53 PM

views 53

विम्बल्डन टेनिस : पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज होणाऱ्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत  गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे. दुसरीकडे, रशियाचा पाचवा मानांकित मेदवेदेव यानं इटलीच्या अव्वल मानांकित यानिक जिनरवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात सात वेळा ...

July 12, 2024 2:47 PM

views 39

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काहीशी सुधारणा

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काही अंशी सुधारणा झाली आहे. मात्र राज्यातल्या २६ जिल्ह्यांमधल्या अडीच हजार गावांत अजूनही पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत या पुरामुळे राज्यातली ३९ हजार हेक्टरवरली पिकं नष्ट झाली आहेत.  राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बुढीदिहिंग, दिसांग आणि कुशियारा या नद्यांनी पूररेषेची पातळी ओल...

July 12, 2024 2:45 PM

views 27

मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने माजी मंत्री बी. नागेंद्र यांना चौकशीसाठी घेतले ताब्यात

कर्नाटकमधल्या महर्षि वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री बी नागेंद्र यांना सक्तवसुली संचालनालयानं आज  चौकशीसाठी ताब्यात घेतलं. अनुसूचित जमाती विकास महामंडळातील १८७ कोटी रुपये बेकायदा हस्तांतरीत करण्यात आले. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल मनी ...

July 12, 2024 1:41 PM

views 30

नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन बस नदीत वाहून गेल्या

नेपाळमध्ये भूस्खलन झाल्यामुळे दोन प्रवासी बस आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या नदीत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये एकूण ६५ प्रवासी होते, यात ७ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. चितवन जिल्ह्यात नारायणघाट - मुगलिंग पट्ट्यात भूस्खलन झाल्यामुळे या बस त्रिशूली नदीत पडल्या.  यातल्या बीरगंजहून काठमांडूला चाललेल्या ब...

July 12, 2024 3:18 PM

views 32

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान सुरू

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत २४६ आमदारांनी मतदानं केलं आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यानंतर संध्याकाळी लगेच मतमोजणी होणार आहे. सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदान कशाप्रकारे करावं, पसंतीक्रम कसा ठेवा...

July 12, 2024 1:22 PM

views 15

नॉन क्रिमीलेयरची ८ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्नमर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची मंत्री अतुल सावे यांची विधानसभेत माहिती

महाराष्ट्रातल्या विविध घटकांना शैक्षणिक प्रवेशासाठी असणारी नॉन क्रिमीलेयरची आठ लाख रुपयांची वार्षिक उत्पन्नमर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती इतर मागास  बहुजन कल्याण प्रवर्ग विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना संजय गायकवाड...

July 12, 2024 1:18 PM

views 42

दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

सर्वोच्‍च न्‍यायालयानं ईडीने दाखल केलेल्या कथित मद्य धोरण प्रकरणात  दिल्‍लीचे  मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज अंतरिम जामीन मंजूर केला.  ईडीनं केलेल्या अटकेला आव्हान देणारी केजरीवाल यांची याचिका न्‍यायाधीश संजीव खन्‍ना आणि दीपांकर दत्‍ता यांच्या  खंडपीठानं मोठ्या खंडपीठाकडे पाठवली आहे. तथापि  ...