July 13, 2024 8:59 PM

views 32

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर

सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत.  पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पार्टीचा उमेदवार विजयी झाला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या देहरा आणि नलगढ मतदारसंघात काँग्रेसच्या, तर हमीरपूरमध्ये भाजपा उमेदवाराने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधल्या...

July 13, 2024 9:15 PM

views 27

मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी

मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून पाऊस सुरु असून मुंबईत पावसाने जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवरील काही गाड्या उशीराने धावत आहेत. हवामान विभागानं मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे.  पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी सह अनेक ठिकाणच्य...

July 13, 2024 9:12 PM

views 25

टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा झिंबाब्वेवर निर्णायक विजय

झिंबाब्वेमधे हरारे इथं आज झालेल्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं झिंबाब्वेवर १० गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला, आणि झिंबाब्वेचा डाव १५२ धावांवर संपुष्टात आणला. झिंबाब्वेचा कर्णधार सिंकदर रझानं सर्वाधिक ४६ धावा केल्या. भारतातर्फे खलिल...

July 13, 2024 8:40 PM

views 27

कायद्याचं शिक्षण प्रादेशिक भाषेत मिळायला हवं – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड

सर्वसामान्य लोकांना कायद्याची मुलतत्त्वे जर सोप्या भाषेत समजाऊन देता आली नाहीत तर तो कायदे शिक्षण आणि कायद्याच्या व्यवसायामधला दोष आहे. असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी म्हटलं आहे. ते आज लखनौमधे डॉ. राममनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. कायद्याचं शिक्षण प्राद...

July 13, 2024 8:34 PM

views 26

प्रधानमंत्री राज्यात आले की प्रगती आणि विकासाची दार उघडतात – मुख्यमंत्री

प्रधानमंत्री राज्यात आले की प्रगती आणि विकासाची दार उघडतात. सर्व सामान्य माणसाचं आयुष्य सुखकर करणे हा मोदींचा अजेंडा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या २९ हजार...

July 13, 2024 3:27 PM

views 28

रब्बी हंगमात शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धान्याचे 65 कोटी रुपये शेतकऱ्यांना सोमवार पासून होणार वितरीत

गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात केलेल्या खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात रक्कम वर्ग केला गेला आहे. यानंतर आता येत्या सोमवार पासून धान्याच्या खरेदीचा परतावा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केला जाणार आहे. गेल्या रब्बी हंगा...

July 13, 2024 3:20 PM

views 21

पुष्पकमल दहल प्रचंड यांनी बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्ष नेते के. पी. शर्मा ओली यांचा सरकार स्थापनेचा दावा

नेपाळमधे पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने बहुमत गमावल्यानंतर विरोधी पक्ष नेते के. पी. शर्मा ओली यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची काल रात्री उशिरा भेट घेऊन ओली यांनी नेपाळ काँग्रेस आणि इतर लहान पक्षांचा पाठिंबा अपल्याला असल्याचा दावा सादर केला. य...

July 13, 2024 3:17 PM

views 17

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जास्मिन पाओलिनीची लढत बार्बोरा क्रेजिकोव्हाशी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज संध्याकाळी महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ७व्या मानांकित जास्मिन पाओलिनीची लढत ३१व्या मानांकित बार्बोरा क्रेजिकोव्हाशी होणार आहे.चेक प्रजासत्ताकच्या क्रेजिकोव्हानं गुरुवारी उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिच्यावर विजय मिळवून विम्बल्डनच्या पहिल्याच अंतिम फेरीत प्...

July 13, 2024 3:14 PM

views 14

पुढील ३ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील ३ दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, रायलसीमा, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं उद्यापर्यंत आसाम, मेघालय, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेशात...

July 13, 2024 9:18 PM

views 33

महाराष्ट्राला जगाचं आर्थिक विकासाचं शक्तीकेंद्र बनवण्याचं लक्ष्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्तीकेंद्र आणि फिन्टेक राजधानी बनवणं हे आपलं हे आपलं स्वप्न असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात २९ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं...