November 10, 2025 9:55 AM

views 34

ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिश भानवालला रौप्यपदक

इजिप्तमधील कैरो इथं सुरू असलेल्या, ISSFजागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल नेमबाजी प्रकारात, भारताच्या अनिश भानवालाने रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेतील हा ऐतिहासिक विजय आहे. अंतिम फेरीत अनिशने २८ लक्ष्ये गाठली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अनिश ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारा पह...

November 9, 2025 8:11 PM

views 34

उत्तराखंड राज्याचा आज २५वा स्थापना दिवस

उत्तराखंड राज्याचा आज २५वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांनी विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या आठ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन केलं...

November 9, 2025 8:08 PM

views 76

बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. आज शेवटच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधनच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून… - होल्ड व्हीसी - - (१. ११...

November 9, 2025 8:02 PM

views 33

प्रशांत महासागरात झालेल्या ६ पूर्णांक ७ रिक्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर, जपाननं इवाते प्रांतासाठी त्सुनामीचा इशारा

  प्रशांत महासागरात झालेल्या ६ पूर्णांक ७ रिक्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर, जपाननं इवाते प्रांतासाठी त्सुनामीचा इशारा दिला आहे. या भूकंपामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला असून, काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली शिंकान्सेन बुलेट ट्रेन सेवा थोड्या काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. सानरिकू किनाऱ्याजवळ...

November 9, 2025 7:58 PM

views 41

अमेरिकेत सरकारी कामकाज बंद पडल्याचा परिणाम हवाई वाहतूक सेवेवर झाला असून सुमारे सतराशे उड्डाणं रद्द

अमेरिकेत सरकारी कामकाज बंद पडल्याचा परिणाम हवाई वाहतूक सेवेवर झाला असून सुमारे सतराशे उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकेतल्या प्रमुख विमानतळांवरच्या उड्डाणांमधे ४ टक्के कपात करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं उड्डाणांची संख्या कमी करणं आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. शटडाऊनच्या ति...

November 9, 2025 7:50 PM

views 30

कोग्नीवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने केला अर्जेंटिनाचा पराभव

जयपूरच्या पोलो ग्राउंडवर झालेल्या २०२५च्या कोग्नीवेरा आंतरराष्ट्रीय पोलो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं जगात अव्वल स्थानी असलेल्या अर्जेंटिनाचा १०-९ असा पराभव केला. या ऐतिहासिक विजयानं पोलोची जन्मभूमी असलेल्या भारतात, या क्रीडाप्रकाराच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सवाई पद्मनाभ...

November 9, 2025 7:19 PM

views 19

संघाचे विचार स्वीकारले तर सर्व धर्माचे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत येऊ शकतात-सरसंघचालक मोहन भागवत

आपापलं वेगळेपण बाजूला ठेवून संघाचे विचार स्वीकारले तर सर्व धर्माचे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत येऊ शकतात, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. तसंच जे हिंदू भारत मातेसमोर नतमस्तक होतात, अशा हिंदूनाच आरएसएसमधे स्थान आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुस्लीम ध...

November 9, 2025 7:14 PM

views 35

राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

शिक्षक पात्रता परीक्षा-टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या आणि इतर मागण्यांसाठी, राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर जिल्हा शाखेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जिल्हा परिषद, आणि खासगी शाळांमधल्या २५ पेक्...

November 9, 2025 7:09 PM

views 34

मुंबई विद्यापीठात “पॉलिमर केमिस्ट्री रिसर्च लॅबोरेटरी” या संशोधन प्रयोगशाळेचं नूतनीकरण

मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात “पॉलिमर केमिस्ट्री रिसर्च लॅबोरेटरी” या संशोधन प्रयोगशाळेचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. युरोफिन्स या कंपनीच्या उद्योग सामाजिक दायित्व निधीतून, या प्रयोगशाळेत अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमुळे पॉलिमर, बॅटरी सामुग्री आणि अनुप्रयुक्...

November 9, 2025 7:04 PM

views 22

राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल

राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. मुंबईत गेले दोन दिवस रात्रीच्या तापमानात घट दिसून आली. येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.