January 18, 2026 9:17 AM

views 63

२४ जानेवारीला दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद नवी दिल्ली इथं होणार

केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ संयुक्तपणे नवी दिल्ली इथं या महिन्याच्या २४ तारखेला दुसरी जागतिक बौद्ध शिखर परिषद आयोजित करणार आहेत. ही शिखर परिषद सामूहिक ज्ञान, संयुक्त आवाज आणि परस्पर सहअस्तित्व या संकल्पनेवर आयोजित केली जाईल, अशी माहिती मंत्रालयानं  दिली. सामाजिक सौहार्द...

January 18, 2026 8:37 AM

views 45

पुण्यात पीएम सेतू कार्यशाळेत शासकीय तंत्र निकेतनांना उद्योगांद्वारे व्यवस्थापित संस्था बनविण्यावर मंथनाचं आयोजन

भारताच्या कौशल्य विकासाला दिशा देण्यासाठी पीएम-सेतु योजनेअंतर्गत, पुण्यात यशदा इथं उद्या एक उद्योग कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. शासकीय तंत्र निकेतनांमध्ये उद्योगांच्या मदतीनं सुधारणा करुन त्यांना उद्योग-व्यवस्थापित संस्था बनविण्याच्या उद्देशानं ही कार्यशाळा होत आहे.  पीएम सेतु म्हणजे म्हणजे प्र...

January 18, 2026 8:31 AM

views 96

ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यात सज्जता.

पुणे ग्रँड चॅलेंज सायकलिंग स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यामध्ये सज्जता करण्यात आली आहे. उद्यापासून २३ तारखेपर्यंत जिल्ह्यातील ४३७ किलोमीटर मार्गावरून जगभरातील 35  संघांमधील 170 आणि भारताचे अ आणि ब संघातील सायकलपटू पुण्याचा नागरी परिसर, वारसा-संपन्न स्थळं आणि रमणीय ग्रामीण प्रदेशातून सायकल चालविण्याचं आव्ह...

January 17, 2026 7:23 PM

views 50

मुंबईत पोलिसांसाठी ४५ हजार घरं बांधण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थानं बांधायला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसंच, शिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या टोलशुल्काला आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुंबईत नागरी परिवहन प्रकल्प टप्पा दोनसाठीच...

January 17, 2026 7:23 PM

views 65

देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला प्रधानमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात विकासकामांना वेग देणाऱ्या ३ हजार २५० कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं आज उदघाटन केलं.    मालदा रेल्वे स्थानकातून हावडा, गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला...

January 17, 2026 7:14 PM

views 23

उद्धव ठाकरेंचा पक्ष मुंबईच्या महापौर पदासाठी आशावादी तर महायुतीचा महापौर होणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त

मुंबईत भाजपाला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, तेवढ्या शिवसेनेला गेल्या तीन निवडणुकांमध्येही मिळाल्या नव्हत्या. आता मुंबईचा महापौर कोण होणार हे शिवसेनेसोबत बसून ठरवणार आहोत, त्यात काहीही वाद नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं. मुंबईला जगातलं सर्वोत्तम श...

January 17, 2026 6:58 PM

views 15

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात आगामी जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आपल्या या मागणीसाठी त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात नुकत्याच झा...

January 17, 2026 6:53 PM

views 16

अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत, वाहनधारकांना मोठा दिलासा

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच ईलेक्ट्रीकल मोटार कार, बसेस ...

January 17, 2026 7:00 PM

views 18

महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले वाद चव्हाट्यावर

महानगरपालिका निवडणूक निकालानंतर मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबई महानगरपालिकेत पक्षाची कामगिरी २०१७ च्या तुलनेत वाईट झाल्याचं सांगत काँग्रेस नेत्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. २०१७ मधे काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते, या निवडणुक...

January 17, 2026 6:26 PM

views 20

महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं भाजपाचं अभिनंदन

महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाचं अभिनंदन केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे पक्षाचा पराभव झाल्यानंतर ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक निकालाचं पक्षाचे नेते एकत्र बसून विश्लेषण करतील असं पवार म्हणाले. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्र...