July 16, 2024 3:01 PM
30
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाच सुरक्षादल जवानांचा आज मृत्यू झाला. यात लष्कराच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या भागात दहशतवाद्यांचा वावर असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कार्य...