July 16, 2024 6:29 PM

views 32

वंचित बहुजन आघाडीची २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा

ओबीसी आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला सुरुवात होणार असून विदर्भ, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून या यात्रे...

July 16, 2024 7:59 PM

views 26

सदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत व्हावं यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षांकडून या बैठकीत सहकार्य मागणार आहेत. येत्या २२ तारखेपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. १२ ऑगस्टला त्याची सांगता होईल. २३ जुलै रोज...

July 16, 2024 3:48 PM

views 20

कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे- रामदास आठवले

कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे; प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातलं कौशल्य असणं आवश्यक आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल संगितलं. जागतिक कौशल्य दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कौशल्य आणि व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे विविध क्षेत्रातील प्रशिक्षणार्थींना त...

July 16, 2024 3:47 PM

views 24

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ जुलैला भाजपाचं व्यापक अधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी, 21 तारखेला भाजपाच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांचं व्यापक अधिवेशन पुण्यात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले सर्व केंद...

July 16, 2024 3:36 PM

views 22

नीट पेपर फुटी प्रकरणी झारखंडमध्ये एकाला अटक

नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने काल रात्री झारखंडमधे हजारीबाग इथल्या एका गेस्ट हाऊसमधून एकाला अटक केली आहे. त्याच बरोबर हजारीबाग इथून अटक झालेल्यांची संख्या ५ झाली आहे. या व्यक्तीच्या ताब्यातून महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे.

July 16, 2024 3:24 PM

views 18

सरकारची पाचवी सकारात्मक स्वदेशीकरण यादी प्रसिद्ध

संरक्षण क्षेत्रातली आयात कमी करून आत्मनिर्भरतेवर भर देण्याच्या उद्देशानं सरकारनं पाचवी सकारात्मक स्वदेशीकरण यादी प्रसिद्ध केली आहे. लाइन रिप्लेसमेंट युनिट्स, सुटे भाग, कच्चा माल अशा एकंदर ३४६ वस्तूंचा समावेश या यादीत आहे. याचं आयात मूल्य एक हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. यापूर्वी या वस्तू फक्त ...

July 16, 2024 3:25 PM

views 40

पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी 25 लाख डॉलरच्या निधीचा पहिला हप्ता भारताकडून जारी

भारतानं पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी 25 लाख डॉलरचा निधीचा पहिला हप्ता काल संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थेकडे म्हणजे यूएनआरडब्ल्यूएकडे काल जारी केला. भारतानं 2024-25 या वर्षात पन्नास लाख डॉलर मदत देण्याचं जाहीर केलं आहे. पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी औषधं, शिक्षण, मदत आणि सामाजिक सेवा यांच्या...

July 16, 2024 2:59 PM

views 20

वस्तू आणि सेवा निर्यातीत ५ पूर्णांक ४ दशांश टक्के वाढ

 देशाची वस्तू आणि सेवा निर्यात जून महिन्यात ५ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांनी वाढून ६५ अब्ज ४७ कोटी डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत निर्यात ८ पूर्णांक ६ दशांश टक्क्यांनी वाढून २०० अब्ज ३३ को...

July 16, 2024 2:58 PM

views 21

तेलंगण सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नियमावलींची अधिसूचना प्रसिद्ध

तेलंगण सरकारनं शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नियमावलींची अधिसूचना काल प्रसिद्ध केली. शेतकऱ्यांच्या एका कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे, असं या नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे. शेतकरी कुटुंब निश्चित करण्यासाठी नागरी पुरवठा विभागानं दिलेली अन्नसुरक्षा पत्रिका ग्राह्य धर...

July 16, 2024 8:01 PM

views 18

साक्षीदारांच्या चौकशीसाठी पोलीसांच्या अखत्यारीतली जागा न निवडण्याचे केंद्रिय गृह मंत्रालयाचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

गुन्ह्याचा तपास करताना साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातली किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतली जागा निवडू नये असं केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी या संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवां...