July 19, 2024 5:14 PM

views 33

रायगड : कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदारचा दरीत पडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील कुंभे धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या अन्वी कामदार हिचा रील्स करताना पाय घसरल्याने दरीत पडून मृत्यू झाला; या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे.   पोलीस प्रशासनानं धबधबे, नदी, धरण, डोंगर परिसरात जीव धोक्यात घालणारी हुल्लडबाजी (स्टंटबाजी) करण्याबाबत...

July 19, 2024 3:49 PM

views 21

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकर विरोधात खटला दाखल

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने खटला दाखल केला आहे. परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन करत पूजा खेडकर यांनी स्वतःचं, वडिलांचं आणि आईचं नाव बदललं.तसंच फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबरसह पत्ता बदलून आपली खोटी ओळख दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर ठ...

July 19, 2024 3:35 PM

views 16

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या यात्रेकरूंची एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून आज ४ हजार ८२१ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. दीडशे वाहनांच्या ताफ्यासह यात्रेकरूंनी आज पहाटे बेस कॅम्प सोडला. यापैकी एक हजार ७३१ यात्रेकरू काश्मीर खोऱ्यातल्या बालताल बेस कॅम्पकडे, तर तीन हजार ९० यात्रेकरू प...

July 19, 2024 3:32 PM

views 16

उत्तर प्रदेशमधल्या गोंडा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या चार वर

उत्तर प्रदेशमधल्या गोंडा रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चार वर पोहोचली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या २ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.उत्तरप्रदेशमध्ये काल दुपारी दिब्रुगडला जाणाऱ्या रेल्वे गाडीचे २१ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले होते. लखनौ-गोहाटी मुख्य रे...

July 19, 2024 3:20 PM

views 28

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ,तसेच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन्...

July 19, 2024 3:14 PM

views 22

दुधाला हमी भाव मिळवून देण्‍यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं कायदा करावा- राधाकृष्‍ण विखे पाटील

दुधाला हमी भाव मिळवून देण्‍यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं कायदा करावा, अशी मागणी दुग्ध व्‍यवसाय मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सहकार मंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. दूध दरातल्या चढ-उताराचा मोठा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन सरकारनं दूध उत्‍पादकांना दिलासा ...

July 19, 2024 2:58 PM

views 21

कीर्ति या केंद्र सरकारच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याच उद्घाटन मानसुख मांडविय यांच्या हस्ते होणार

केंद्र सरकारच्या कीर्ती अर्थात खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं होणार आहे.   तळागाळातल्या प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कीर्ती हा उपक्रम सुरु ...

July 19, 2024 2:50 PM

views 27

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्सचा ८१ हजार ५८८ अंकांचा नवा उच्चांक

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज सुरुवातीच्या सत्रात ८१ हजार ५८८ अंकांचा नवा विक्रमी उच्चांक नोंदवला, मात्र जागतिक बाजारातल्या कमकुवत स्थितीच्या पार्श्वभूमीवर तो १६७ अंकांनी घसरला आणि ८१ हजार १७७ अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं देखील सुरुवातीच्या सत्रात २४ हजार ८५५ अंकांचा नवा उच...

July 19, 2024 2:45 PM

views 42

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीने भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे संकेत -रिझर्व्ह बँक

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीने भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे संकेत दिले आहेत, असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. कृषी क्षेत्राबाबतचा नवा दृष्टिकोन, आणि ग्रामीण भागातली वाढती मागणी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं आपल्या मासिक अहवालात म्हटलं आहे.    ...

July 19, 2024 7:28 PM

views 33

महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा आज पाकिस्तानशी सामना

महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध होत आहे. श्रीलंकेमध्ये दाम्बुला इथं रनगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.   दरम्यान, आज दुपारी झालेल्...