July 23, 2024 8:45 PM

views 28

इथियोपिया : भूस्खलानात १५५ जणांचा मृत्यू

इथियोपिया इथं भूस्खलानामुळे झालेल्या मृतांची संख्या १५५ झाली आहे. इथिओपियामधल्या गेझे गोफा जिल्ह्यात काल सकाळी हे भूस्खलन झालं होतं. आतापर्यंत महिला आणि बालकांचे मिळून ५५ मृतदेह सापडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. इथियोपियामध्ये सध्या पावसाळा सुरू असून...

July 23, 2024 8:48 PM

views 30

जल जीवन मोहिमेअंतर्गत १५ कोटी कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पाणी

जल जीवन मोहिमेनं देशभरातल्या ग्रामीण भागातल्या १५ कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडण्या देऊन ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जल जीवन मोहिमेच्या माध्यमातून लोकांना शुद्ध पाणी मिळालं असून त्यांत जीवनमान सुधारलं असल्याचं जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.२०२...

July 23, 2024 8:20 PM

views 26

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रेल्वेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वेच्या एकूण अर्थसंकल्पातल्या १ लाख ८ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची तरतूद सुरक्षे संबंधित कामांसाठी राखीव ठेवण्यात आले अस...

July 23, 2024 8:08 PM

views 21

मेळघाटात मध्य प्रदेशाच्या सीमेवर झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू

मेळघाटात मध्य प्रदेशाच्या सीमेवर मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यु झाला, तर ११ जण गंभीर झाले. मध्य प्रदेशातल्या खालवा तालुक्यात रोशनी चौकी इथं हा अपघात झाला. भर पावसात स्थानिक प्रशासनानं मदत कार्य सुरु केलं आहे.

July 23, 2024 8:05 PM

views 20

कोल्हापुरात पावसाची बॅटींग, पंचगंगा नदी दुथडी भरून वाहली

कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू असल्यानं पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरलं आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोयना धरणातून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानं नदीकाठच्या गावांना ...

July 23, 2024 7:43 PM

views 18

हिंगोली जिल्हा रुग्णालयातल्या बालरोग विभागाला राज्यातला पहिला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार जाहीर

हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातल्या बालरोग विभागाला महाराष्ट्र राज्यातला पहिला राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन केंद्र अंतर्गत आणि केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल क्वालिटी ॲशोरन्स अंतर्गत केलेल्या परीक्षणाद्वारे हिंगोली जिल्...

July 23, 2024 7:40 PM

views 27

धाराशिवमध्ये भारतीय न्याय संहितेतल्या कायद्यांसंदर्भात जनजागृतीसाठी प्रदर्शन

भारतीय न्याय संहितेतल्या कायद्यांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीत ध्वनीचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रसरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी संयुक्तपणे ...

July 23, 2024 7:33 PM

views 27

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस, पेरण्या समाधानकारक

राज्यात सरासरीच्या १२३ पूर्णांक २ दशांश टक्के पाऊस झाला असून पेरण्याही समाधानकारक झाल्या आहेत. याबद्दलचं सादरीकरण आज कृषी विभागानं मंत्रिमंडळ बैठकीत केलं. राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत १२८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सुमारे ९१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. राज्यात...

July 23, 2024 9:03 PM

views 31

रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, MSME आणि मध्यमवर्गीयांना प्राधान्य देणारा अर्थसंकल्प सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज चालू आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. त्यात रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग आणि मध्यमवर्गीयांवर यात विशेष लक्ष देण्यात आलं आहे. नवीन आयकर पद्धत स्विकारणाऱ्यांसाठी त्यांनी विविध सवलतींची घोषणा यात केली. याशिवाय त्य...

July 23, 2024 8:51 PM

views 28

अर्थसंकल्प २०२४ : नवीन आयकर प्रणाली अंतर्गत वाढीव करसवलती

नवीन आयकर प्रणालीचा स्वीकार करणाऱ्यांसाठी आणखी कर सवलतींचा लाभ देण्याची घोषणा सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली. अतिरीक्त १ लाख रुपयांच्या उत्पन्नाला त्यांनी विद्यमान दरापेक्षा कमी कर लादण्याची घोषणा केली. त्यामुळं पगारदारांना आता साडे १७ हजार रुपये कमी आयकर भरावा लागेल. नवीन कर प्रणालीत आता ३...