July 24, 2024 7:26 PM

views 30

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं – मुख्यमंत्री 

जागतिक पातळीवर हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई इथं दिले. ते सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या हळद संशोधन केंद्राबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते.   हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथे आगामी ३ वर्षा...

July 24, 2024 7:17 PM

views 19

मुंबई उपनगरीय रेल्वेत येत्या ५ वर्षांमध्ये २५० नव्या रेल्वे धावणार

मुंबई उपनगरीय रेल्वे यंत्रणेची क्षमता वाढवण्याचं काम वेगाने सुरू असून येत्या ५ वर्षांमध्ये जवळपास २५० नव्या रेल्वे धावणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली.   उपनगरीय रेल्वे आणि दूरच्या पल्ल्याच्या गाड्यांच्या यंत्रणा वेगवेगळ्या करणं, त्यासाठी वेगवेगळे आराखडे तय...

July 24, 2024 7:06 PM

views 39

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या सोमवारी मुंबईत विधान भवनात आजी माजी आमदारांना संबोधित करणार

येत्या सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते, २०१७-१८ पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ठ संसदपटू आणि सदस्यांना उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे...

July 24, 2024 7:03 PM

views 30

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. जालनाच्या आंतरवाली सराटी इथं गेल्या पाच दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. सरकारचा जीव ज्या खुर्चीत अडकला आहे, ती खुर्ची मिळवण्याच्या तयारीला आम्ही लागणार आहोत, असं जरांगे यांनी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले...

July 24, 2024 6:50 PM

views 21

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना २४ तासांसाठी ‘रेड अलर्ट’

हवामान खात्यानं येत्या २४ तासांकरता पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट तर मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथली खुनी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळं मांडवी आणि पाटणबोर...

July 24, 2024 7:15 PM

views 18

दक्षिण महाराष्ट्र,कोकण,आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती

हवामान खात्यानं आज पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दक्षिण महाराष्ट्र, कोकण, आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.   कोल्हापूर जि...

July 24, 2024 2:57 PM

views 31

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या संचालकपदी रोनाल्ड एल. रोवे यांची नियुक्ती

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या संचालकपदी रोनाल्ड एल. रोवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या उपसंचालकपदावर कार्यरत होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्यानंतर अमेर...

July 24, 2024 2:54 PM

views 29

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांचं भारतात आगमन

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांचं आज भारतात आगमन झालं. मंत्रिपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच औपचारिक दौरा आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी लॅमी यांचं स्वागत केलं. या दौऱ्यामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातली सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट हो...

July 24, 2024 2:50 PM

views 9

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत सुधारणा

सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत सुधारणा केली आहे. नव्या सुधारणेनुसार न्यायालयाचं कामकाज आता सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. सार्वजनिक सुट्टी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालयाचं कामकाज बंद राहील. १ ऑगस्टपासून नवे नियम लागू केले जाणार आहेत.

July 24, 2024 2:41 PM

views 27

कर्करोगावरील औषधांच्या आयात शुल्कात सूट देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

कर्करोगावरची औषधं सहजरित्या उपलब्ध व्हावीत, यासाठी या औषधांच्या आयात शुल्कात सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली. यात स्तनांच्या कर्करोगासाठी, फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी आणि पित्तनलिकेच्या कर्करोग...