July 25, 2024 1:45 PM

views 16

ब्रिटनबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डेव्हिड लॅमी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ब्रिटनसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भेटीनंतर सांगितलं.डेव्हिड लॅमी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लाग...

July 25, 2024 1:46 PM

views 18

विरोधकांनी जनादेशाचा अपमान केल्याची संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची टीका

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देशानं दिलेल्या जनादेशाचा अपमान केल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज केली. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. अर्थसंकल्पावर अर्थपूर्ण चर्चा अपेक्षित असून, काही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा...

July 25, 2024 12:38 PM

views 21

महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार

महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार आहे. दरम्यान, काल या स्पर्धेत झालेल्या श्रीलंका विरुद्ध थायलंड सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा विजय झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या थायलंडनं वीस षटकांत सात गडी गमावून ९३ धावा केल्या. हे लक्ष्य श्रीलंकेच्या संघाने अवघ्या ...

July 25, 2024 12:26 PM

views 31

कारगिलमध्ये युनिफॉर्म फोर्स मुख्यालयानं आयोजित केलेल्या ‘महिला मोटरसायकल फेरी’ सह विविध कार्यक्रमांचं आयोजन

कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त, कारगिलमध्ये उद्या 26 जुलै रोजी युनिफॉर्म फोर्स मुख्यालयानं आयोजित केलेल्या ‘महिला मोटरसायकल फेरी’ सह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेरीमध्ये भारतीय सैनिकांच्या अदम्य भावनेला आणि नारी शक्तीला मानवंदना देण्यासाठी 25 निष्णात महिला मोटरस...

July 25, 2024 12:24 PM

views 22

भारतीय हवाई दलातील पहिला – महिला कवायत संघ तयार करण्यासाठी 29 अग्निवीरवायू महिला – एकत्र येणार

भारतीय हवाई दलातील पहिला - महिला कवायत संघ तयार करण्यासाठी 29 अग्निवीरवायू महिला - एकत्र येणार आहेत. हा महिला संघ 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त इंडिया गेट संकुलात कवायत करणार आहे.वायुसेनेच्या बँडसह होणाऱ्या, शक्ती आणि एकतेचं प्रतीक असलेल्या या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी; भारतीय वा...

July 25, 2024 11:22 AM

views 4

प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी बिहार विधानसभेत विधेयक मंजूर

बिहार राज्य विधानसभेनं प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणं, परीक्षांमधील गैरप्रकार आणि सरकारी स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी काल एक कठोर विधेयक मंजूर केलं. बिहार सार्वजनिक परीक्षा – गैरमार्ग प्रतिबंध विधेयक 2024 नुसार आता गंभीर प्रकरणांमध्ये 3 वर्षांवरून 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपया...

July 25, 2024 11:20 AM

views 27

सौर्य एअरलाइन्सच्या विमान अपघातात 18 जणांचा मृत्यू

काठमांडूहून पोखराकडे निघालेल्या सौर्य एअरलाइन्सच्या विमानाला काल सकाळी झालेल्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या पूर्वेकडे असलेल्या खंदकात - विमान उड्डाण करत असताना लगेचच कोसळलं आणि विमानाला आग लागली. विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाल्याचं ...

July 25, 2024 10:38 AM

views 14

इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI चा अभ्यास

2022-23 या आर्थिक वर्षात इक्विटी कॅश विभागातील वैयक्तिक इंट्रा-डे ट्रेडर्सपैकी 70 टक्क्यांहून अधिक ट्रेडर्सचं नुकसान झालं असल्याचं SEBI ने केलेल्या एका अभ्यासात आढळून आलं आहे. एकाच दिवसात समभागांची खरेदी आणि विक्री करणे याला इंट्रा-डे ट्रेडींग म्हणतात. आर्थिक वर्ष 2018-19 च्या तुलनेत 2022-23 या आर्थ...

July 25, 2024 10:36 AM

views 26

महान गायक मुकेश ,यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त एका तिकिटाचं अनावरण

भारतीय चित्रपट संगीतातील महान गायक मुकेश , यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल नवी दिल्ली इथे एका तिकिटाचं अनावरण केलं. शेखावत यांनी गायक मुकेश यांच्या संगीतातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली. मुकेश यांनी भारतीय संगी...

July 25, 2024 8:29 PM

views 31

पॅरिस ऑलिम्पिकमधे नेमबाजीच्या रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून भारतीय महिला संघाचं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित

पॅरिस ऑलिम्पिकच्या उदघाटन समारंभाच्या एक दिवस आधी, आज भारतानं शानदार कामगिरीनं सुरुवात केली. नेमबाजीमध्ये भारतीय महिला संघानं रँकिंग फेरीत चौथं स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. भारतीय तिरंदाज तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्यासह दीपिका कुमारी, अंकिता भकट, भजन कौर, आणि बी. धी...