July 25, 2024 8:18 PM

views 39

राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांची सरकारवर टीका

राज्यसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेत विरोधकांनी सरकारवर टीका केली. काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी शेतकरी, गरीब आणि बेरोजगारी हे मुद्दे उपस्थित केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नसून, सरकार अन्नधान्यावर पुरेसं किमान आधारभूत मूल्य देत नसल्याचं ते म्हणाले.   सर...

July 25, 2024 8:14 PM

views 32

यंदाच्या अर्थसंकल्पात पंजाबवर अन्याय झाला आहे – चरणजित सिंह चन्नी

लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा सुरु राहिली. अर्थसंकल्पानं जनतेची घोर निराशा केली असून, यामध्ये पंजाबवर अन्याय झाल्याचा आरोप काँग्रेसचे चरणजित सिंह चन्नी यांनी यावेळी केला. पुरामुळे प्रभावित झालेल्या पंजाबच्या जनतेसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद नसल्याचं ते म्हणाले. या टीकेला उत्तर देताना, म...

July 25, 2024 8:11 PM

views 19

यंदाच्या अर्थसंकल्पावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा

लोकसभेत आज सत्तारूढ आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या जोरदार गदारोळाच्या पार्श्वभूमीवर सभागृहाचं कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं. काँग्रेसचे सदस्य चरणजीत सिंग चन्नी यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत बोलताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे आजोबा यांच्या हत्य...

July 25, 2024 7:52 PM

views 14

मच्छिमार गावं विकसित करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत किनारपट्टीवरची मच्छिमार गावं विकसित करण्यासाठी भारत सरकारनं ४० कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवरील वीस गावांचा समावेश आहे, अशी माहिती भाजपच्या मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी दिली. यामध्ये सिंधुदुर्ग ...

July 25, 2024 7:48 PM

views 24

‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ योजनेला चांगला प्रतिसाद

‘‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या महिन्यात ४ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पास मिळाले आहेत. १८ जूनला ही योजना सुरु झाली. त्यानंतर केवळ १२ दिवसात ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरित केले. ही संख्या गेल्या ...

July 25, 2024 7:43 PM

views 32

‘रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी’

रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी इथं केली. रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद...

July 25, 2024 7:36 PM

views 21

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार’

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून कुशल आणि रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेची मदत होईल, असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योज...

July 25, 2024 7:30 PM

views 19

नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं कांदा महाबँक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं कांदा महाबँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. कांद्यावर अणुऊर्जेद्वारे विकिरण ...

July 25, 2024 7:22 PM

views 44

मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे, प्रशासनाचा निर्णय

जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये ६६ टक्क्यापेक्षा जास्त भर पडली आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईत सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात येत्या २९ जुलै पासून मागे घेण्याचा...

July 25, 2024 7:27 PM

views 26

राज्यात बचावकार्य वेगानं सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश् परिस्थिती आहे, तिथं बचाव कार्य वेगानं सुरु आहे, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असेल तरच, घराच्या बाहेर पडावं असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या स...