July 27, 2024 1:12 PM

views 23

डॉ. एपीजे अबद्ल कलाम यांची आज ९ वी पुण्यतिथी

माजी राष्ट्रपती आणि ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अबद्ल कलाम यांची आज ९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांना देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलाम यांना समाजमाध्यमाद्वारे आंदरांजली वाहिली. कलाम यांचं आयुष्य हा कठोर परिश्रम, साधेपणा आणि संवेदनशीलता यांचा संगम होता, ...

July 27, 2024 1:24 PM

views 30

जम्मू आणि काश्मीर चकमकीत 1 पाकिस्तानी नागरिक ठार, सुरक्षा दलाचे 5 जवान जखमी

जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात मच्चाल सेक्टरमधल्या कामकारी भागात आज सकाळी सुरू झालेल्या चकमकीत एका पाकिस्तानी नागरिकाला ठार करण्यात आलं असून या चकमकीत सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. या भागात अद्यापही चकमक सुरू आहे.

July 27, 2024 12:48 PM

views 22

मन की बात कार्यक्रमातून उद्या प्रधानमंत्री देशवासीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता मन की बात या मासिक कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११२वा, तर मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरचा दुसरा भाग आहे.   हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून, तसंच एआयआ...

July 27, 2024 12:50 PM

views 19

२०२४ च्या अर्थसंकल्पाची रूपरेषा आता नमो ॲपवर

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पाची रूपरेषा नमो ॲपवर सामायिक केली आहे. या रुपरेषेत रोजगार निर्मिती आणि कौशल्या संबंधित विविध सरकारी घोषणा, योजना आणि नवीन उपक्रमांची सोप्या पद्धतीनं माहिती देण्यात आली आहे.   रोजगाराला प्रोत्साहन देणार्‍या योजनांसह नवीन रोजगार निर्माण करणं, ...

July 27, 2024 11:22 AM

views 19

देशातील 30 कोटींहून अधिक नागरिक घेत आहेत डिजीलॉकर सुविधेचा लाभ

देशातील 30 कोटींहून अधिक नागरिक सध्या डिजीलॉकर सुविधेचा लाभ घेत आहेत, तसंच सरकारी संस्थांनी डिजीलॉकरच्या इलेक्ट्रॉनिक फॉर्मटमध्ये आतापर्यंत 675 कोटी ई-दस्तऐवज जारी केले आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री जितीन प्रसाद यांनी काल राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.   डिजीलॉकर सुव...

July 27, 2024 1:18 PM

views 23

एडीपीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रं भारताच्या हाती

  भारताने ए डी पी सी अर्थात आशियाई आपत्ती सुसज्जता केंद्राचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे.  ‘ए डी पी सी’ ही आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रात आपत्ती निवारण आणि पर्यावरण लवचिकता याबाबत सहकार्य आणि अंमलबजावणी करणारी स्वायत्त आंतरराष्ट्रीय संघटना असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.   भारतासह बां...

July 27, 2024 10:56 AM

views 31

नीट-यूजी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA नं काल राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा अर्थात नीट युजी परीक्षेच्या सुधारित अंतिम गुणपत्रिका प्रसिद्ध केल्या आहेत. नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल आणि गुणपत्रिका पाहता येतील.   या परीक्षेत 17 उमेदवारांनी पहिला...

July 27, 2024 10:54 AM

views 33

मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून भारतीय हवामान विभागानं मुंबईसाठी दक्षतेचा पिवळा बावटा दाखवला आहे. मुंबईमध्ये काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागानं मुंबईसह पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील पिवळा बावटा तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी नारंगी बावटा जारी केला आहे.

July 27, 2024 11:07 AM

views 30

महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल

महिलांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. गत विजेत्या भारतीय संघानं बांग्लादेशचं 81 धावांचं आव्हान केवळ 11 षटकांत पूर्ण केलं.   भारताची सलामीवीर स्मृती मंधाना हिनं 39 चेंडूत 55 धावा केल्य...

July 27, 2024 9:50 AM

views 28

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं संकट

  कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात पाणी घुसू लागलं असून, नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प झाली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या सरी वगळता पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा‌ अद्याप कायम आहे. यामुळे २६५ मालमत्तांची पडझड झाली असून जिल्ह्यात आज पर्यंत ९८.६२ लाख रुपयांचं नुक...