July 29, 2024 7:21 PM

views 15

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या अर्नाळा किनाऱ्याजवळची अनधिकृत रिसॉर्ट्स जमीनदोस्त

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या अर्नाळा किनाऱ्याजवळची अनधिकृत रिसॉर्ट्स आज जमीनदोस्त करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही रिसॉर्ट्स पाडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशावरून महानगर पालिकेनं ही कारवाई केली.   शिवसेना नेते आणि परिवहन समितीचे माजी अध्यक्ष मिलिंद मोरे हे काल कुटुंबासह ...

July 29, 2024 7:16 PM

views 24

आषाढी वारीत सहभागी १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी रुपये प्रदान

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातल्या १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी रुपये प्रदान करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. या दिंड्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २० हजार रुपये...

July 29, 2024 6:59 PM

views 15

आमदार अपात्रताप्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही अशाच प्रकारची याचिका सादर केली आहे. दोन्ही याचिकांवर सर्वोच्च...

July 29, 2024 8:43 PM

views 23

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिराग ही भारतीय जोडी पुढच्या फेरीत दाखल

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत पुरुष गटात अर्जुन बबुता आणि महिला गटात रमिता जिंदल यांना पदक मिळवण्यात अपयश आलं. अंतिम क्रमवारीत रमिता सातव्या स्थानावर तर अर्जुन चौथ्या स्थानावर राहिल्याने त्याचं पदक थोडक्यात हुकलं. बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत...

July 29, 2024 7:13 PM

views 17

दिव्यांगांसाठी सुविधा देणारं पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिव्यांगांसाठी एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देणारं पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत दिव्यांग कल्याण महामंडळाच्या बैठकीत बोलत होते.   दिव्यांगांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणारी य...

July 29, 2024 7:04 PM

views 27

जातीआधारित जनगणना करण्याची लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मागणी

जातीआधारित जनगणना करावी आणि किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. इंडिया आघाडीचं सरकार आल्यास या दोन्ही गोष्टी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या लोकसंख्येच्या ७३ टक्के असलेल्या अनुसूचित जाती, ...

July 29, 2024 4:03 PM

views 24

सर्वोच्च न्यायालयाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आजपासून विशेष लोकअदालत सप्ताहाचं आयोजन

सर्वोच्च न्यायालयाच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आजपासून विशेष लोकअदालत सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे. न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणं निकाली काढणं, हा या सप्ताहाचा मुख्य हेतू असल्याचं न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. लोकअदालती, न्याय मिळवण्याचा सोपा आणि सुलभ मार्...

July 29, 2024 3:58 PM

views 20

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा चौथा वर्धापनदिन साजरा

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा चौथा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आज नवी दिल्लीत ‘अखिल भारतीय शिक्षा समागम’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण  मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांचंं उद्घाटन होईल.  शिक्षण धोरणाच्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत...

July 29, 2024 3:53 PM

views 19

बिहारमधल्या जाती आधारित आरक्षण रद्द करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बिहारमधल्या नोकऱ्या आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठीचं जाती आधारित ६५ टक्के आरक्षण रद्द करण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयानं नोटीस बजावली असून यावर सप्टेंबर महिन्यात सुनावणी घेण्याचं म...

July 29, 2024 3:42 PM

views 15

भारत आणि सौदी अरेबिया देशांची विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक वाढवण्यासंबंधी चर्चा

भारत आणि सौदी अरेबिया या देशांनी, शुद्धीकरण, नवीकरणीय ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल कारखान्यांसहित विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक वाढवण्यासंबंधी चर्चा केली. उभय देशांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय कार्यबलाच्या पहिल्या बैठकीत दोन्ही देशांना फायदेशीर होईल, अशा पद्धतीने गुंतवणूक वाढवण्याच्या उपाययोजनांचा...