August 4, 2024 7:08 PM

views 18

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर धोकादायक भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, त्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्याची मदत घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  तसंच, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्...

August 4, 2024 7:01 PM

views 21

९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीच्या सरहद संस्थेत होणार

९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीच्या सरहद संस्थेत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं आज मुंबई मराठी साहित्य संघ इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या संमेलनासाठी एकूण सात संस्थांनी निमंत्रण दिलं होतं. त्यापैकी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेची इचलकरंजी शाखा, ...

August 4, 2024 6:56 PM

views 21

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात  निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. पुण्यात आगा खान पॅ...

August 4, 2024 6:37 PM

views 15

चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४तास पाणीपुरवठा प्रकल्पाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मोदी सरकार पूर्ण पाच वर्षं टिकेल, आणि २०२९ मधे पुन्हा रालोआ सरकारच सत्तेवर येईल  असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. चंदीगडमध्ये स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बांधलेल्या २४तास पाणीपुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर  ते बोलत होते. देशातल्या जनतेनं प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यावर विश्वा...

August 4, 2024 7:23 PM

views 28

पॅरिस ऑलिम्पिक : पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा गोलफरकानं पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये मात्र भारताच्या लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत टोक्यो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता व्हिक्टर ॲक्सेलसेन याच्याकडून थेट गेम्समध्ये पराभव पत्करावा ...

August 4, 2024 3:07 PM

views 27

पालकमंत्री अजित पवार यांचेकडून पुणे जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि त्यामुळे या नद्यांवरच्या धरणांमधून वाढवलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमझल्या पूरपरिस्थितीचा आ...

August 4, 2024 7:05 PM

views 22

राज्याच्या अनेक ठिकाणी धरणातल्या पाण्याचा विसर्ग

मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवल्यामुळे नद्यांकाठच्या गावांमधल्या नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून आजपासून ३५ हजार २ क्युसेक इतका केला आहे. पानशेत, वरस...

August 4, 2024 2:55 PM

views 30

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात येणार

महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार  या यात्रेच्या निमित्तानं सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.  यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशा...

August 4, 2024 2:02 PM

views 38

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना

इस्राइल आणि हिजबुल्लाह यांच्यातल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यास खबरदारी म्हणून अमेरिका आणि इंग्लडनं लेबनाॅन मधल्या आपल्या नागरिकांना तिथून तातडीनं बाहेर पडण्याची सूचना केली आहे. अनेक विमान कंपन्यानी लेबनाॅन मधल्या हवाई सेवा रद्द केल्या असल्या तरी अद्याप काही विमान...

August 4, 2024 8:05 PM

views 28

मध्य प्रदेशात मंदिराची भींत कोसळून ९ लहान मुलांचा मृत्यू

मध्य प्रदेशात, सागर जिल्ह्यातल्या शहापूर इथं आज सकाळी धार्मिक उत्सवादरम्यान हर्दूल बाबा मंदिराची भींत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ लहान मुलांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. भिंतीखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढलं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मध्य प्रदे...