August 5, 2024 8:02 PM

views 25

अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांनी प्रस्तावित केलेल्या अनुदानाच्या थकबाकी मागण्या लोकसभेत मान्य

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विविध मंत्रालयांनी प्रस्तावित केलेल्या खर्चाशी संबंधित अनुदानाच्या थकबाकी मागण्या लोकसभेनं आज चर्चेविना मंजूर केल्या. तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या विनियोजन विधेयक २०२४ लाही सभागृहानं मंजुरी दिली. या विधेयकाच्या माध्यमातून २०२४-२५ या...

August 5, 2024 8:31 PM

views 18

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जम्मू- काश्मिर आणि लडाखमधल्या लोकांसाठी सरकार काम करत असून आगामी काळात या राज्यातल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पाच वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट रोजी संसदेनं कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये प्रगती आणि...

August 5, 2024 7:30 PM

views 54

शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज २ हजार २२३ अंकांनी घसरून ७८ हजार ७५९ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६६२ अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ५६ अंकांवर बंद झाला. जपानचा शेअर बाजार निक्केई कोलमडल्यानं संपूर्ण जगभरातल्या शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळाल...

August 5, 2024 7:47 PM

views 18

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ही योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत आहे, असा आरोप करत नवी मुंबईतले सनदी लेखापाल नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली होती. या याचि...

August 5, 2024 7:16 PM

views 37

देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार – मंत्री चंद्रकांत पाटील

येणाऱ्या काळात देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देणार आहे. त्यामुळे उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी शिक्षणावर जास्त खर्च करायचा आहे, असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावमधल्या अंमळनेर इथं केलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपके...

August 5, 2024 7:13 PM

views 30

बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांचा राजीनामा

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगला देशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ढाक्यातलं प्रधानमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान गोनोभवनवर आज शेकडो आंदोलकांनी हल्ला केला. त्यानंतर शेख हसीना देश सोडून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी निघून गेल्याचं वृत्त आहे. ...

August 5, 2024 8:24 PM

views 24

पॅरिस ऑलिम्पिक : बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचं कास्यपदक हुकलं

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचं कास्यपदक पटकावण्याचं स्वप्न मलेशियाच्या झी जिया ली याच्यामुळे भंगलं. सुरुवातीचा गेम जिंकून घेतलेली आघाडी लक्ष्य सेनला टिकवता आली नाही आणि ली यानं नंतरचे दोन्ही गेम्स जिंकून सामनाही १३-२१, २१-१६, २१-११ अस...

August 5, 2024 8:05 PM

विविध पिकांचे दीड हजार पर्यावरणस्नेही वाण येत्या ५ वर्षात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील

विविध पिकांचे दीड हजार पर्यावरण स्नेही वाण येत्या ५ वर्षात उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून अशा १०९ वाणांचं लोकार्पण लौकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. फलोत्पादन निर्यातीचं उद्दिष्ट ठेवून पुढच्या...

August 5, 2024 7:47 PM

views 16

जोरदार पावसामुळे पाणीपातळी वाढल्यानं अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.   गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अने...

August 5, 2024 3:38 PM

views 21

संसदेच्या सर्व सदस्यांनी एक पेड माँ के नाम या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा – मंत्री भूपेंद्र यादव

संसदेच्या सर्व सदस्यांनी एक पेड माँ के नाम या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असं आवाहन सर्व संसद सदस्यांना पत्राद्वारे केल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना आज ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावर...