August 7, 2024 8:06 PM

views 25

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ : पैलवान Vinesh Phogat हिला लिहिलेलं हे पत्र…

प्रिय विनेश...   ऑलिम्पिकचं पदक तुझ्या गळ्यात विसावलं असतं, तर ते पदक सुंदर झालं असतं. तू पदक गमावलेलं नाहीस विनेश, पदकाने तुला गमावलंय... काही ग्रॅम वजन जास्त भरलं म्हणून भले तुला स्पर्धेतून अपात्र ठरवलं असेल त्यांनी, पण कालच्या दिवसभरात तू दिलेला आनंद, अभिमान पदकापेक्षा कमी आहे का गं? आमच्यास...

August 7, 2024 7:45 PM

views 22

जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून १५ टीएमसी पाणी सोडलं

नाशिक जिल्ह्यात चार दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातली सहा धरणं भरली आहेत तर आणखी सहा धरणांमध्ये ८० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा झाला आहे. मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत पंधरा टीएमसी पाणी सोडल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं.   गेल्या २४ तासात पावसाने विश्रांती घेतली...

August 7, 2024 8:21 PM

views 30

पैलवान विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा निषेध

विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा निषेध संयुक्त जागतिक ऑलिम्पिक संघटनेकडे नोंदवल्याची माहिती क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली. केंद्र सरकार महिला पैलवानांना सर्व प्रकारची मदत देत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः या मुद्द्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्य...

August 7, 2024 7:32 PM

views 24

पॅरिस ऑलिम्पिक : १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी पुढच्या फेरीत दाखल

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी हिनं सातवं स्थान मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. कुस्तीत महिलांच्या ५३ किलो वजनी अंतिम पंघलला तुर्किएच्या प्रतिस्पर्ध्याकडून १०-० असा पराभव पत्करावा लागला. महिलांच्या टेबल टेनिस सांघिक उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीनं भारताचा ३-...

August 7, 2024 8:30 PM

views 20

तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान

श्रीलंकेत कोलंबो इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून २४८ धावा केल्या. अविष्का फर्नांडोचं शतक थोडक्यात हुकलं त्यानं ९६ धावा केल्या. कुशल मेंडिस ...

August 7, 2024 8:35 PM

views 32

महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची काँग्रेसची भूमिका

महाविकास आघाडीत कोणताही पक्ष ‘छोटा भाऊ, मोठा भाऊ’ नाही, महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं.   विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत गां...

August 7, 2024 8:37 PM

views 23

पुण्यात एकही झिकाबाधित नाही, सर्व रुग्ण झिकामुक्त

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून झिकाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नसून लागण झालेले सर्व रुग्ण पूर्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. यात २६ गरोदर महिलांचा समावेश आहे. पुणे शहरात २० जून रोजी झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला होता .  त्यामुळे महापालिकेने औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी...

August 7, 2024 6:59 PM

views 20

राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनाच्या कृती समितीची बैठक

राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटनाच्या कृती समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठक घेऊन उच्चाधिकार समितीने याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामंडळाचं उत्पन्न वाढावं यासाठी दोन हजार नवीन...

August 7, 2024 8:34 PM

views 50

वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

राज्यातल्या अल्पसंख्यंकांच्या उन्नती करता टार्टी, बार्टी, महाज्योतीच्या धरतीवर मार्टी अर्थात अल्पसंख्यांक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संस्थेसाठी एकूण ११ पदं निर्माण केली जातील. तसंच प्रशासनिक खर्चासाठी ६ कोटी २५...

August 7, 2024 6:29 PM

views 11

पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन देण्यात येणार आहे. १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना ६ हजार, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना ८ हजार तर पदवीधर किंवा पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना १० हजार विद्यावेतन देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असे...