August 9, 2024 10:25 AM

views 29

भारताला कांस्य पदक मिळून दिल्याबद्दल हॉकी इंडियाकडून हॉकी संघाला बक्षीस जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं कास्य पदक पटकावलं आहे. काल झालेल्या कास्य पदकासाठीच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच विविध केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या पुरुष हॉकी संघा...

August 9, 2024 2:24 PM

views 20

बांगलादेश हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून डॉ. मोहम्मद युनूस यांनी घेतली शपथ

बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून काल नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांनी शपथ घेतली. बांगलादेशाचे राष्ट्रपति महंमद शाहबुद्दीन यांनी त्यांना ढाका इथ वंग भवन इथ पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   मोहम्मद युनूस यांचा जन्म 28 जून 1940 र...

August 9, 2024 1:11 PM

views 22

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ऑकलंड भारतीय समुदायाशी संवाद साधणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्या दोन दिवसीय न्यूझीलंड दौऱ्यात आज ऑकलंड इथं आयोजित एका नागरी स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायाशी आणि भारताच्या मित्र परिवाराशी संवाद साधणार आहेत. न्यू झीलंडमध्ये ३ लाखाहून अधिक भारतीय राहतात.    दरम्यान, न्यू झीलंड बरोबरचे राजनैतिक  संबंध अधिक दृढ करण्यासाठी ...

August 8, 2024 8:26 PM

views 32

जपानच्या नैऋत्य भागात ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

जपानच्या नैऋत्य भागात आज ७ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचं वृत्त नाही. जपानच्या हवामान विभागानं मियाझाकी, कोची, ओटा, कागोशिमा आणि एहिम प्रीफेक्चर्सच्या किनारी भागांत सुनामीचा इशारा दिला आहे.

August 8, 2024 8:22 PM

views 40

ॲपल कंपनी भारतातलं उत्पादन दुप्पट करणार

आयफोन निर्मिती करणारी ॲपल ही कंपनी भारतातलं उत्पादन दुप्पट करणार आहे. भारतातली आयफोनची विक्री ८ बिलियन डॉलर इतकी झाल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी फोन संचाची निर्मिती करणारी फॉक्सकॉन कंपनी तामिळनाडूच्या श्रीपरंबदूर इथं आयपॅडचा निर्मिती प्रकल्प सुरू करणार आहे.

August 8, 2024 8:11 PM

views 26

कांदा आणि बटाट्याच्या दर वाढीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांचं निदर्शन

कांदा आणि बटाट्याच्या दर वाढीवरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतुदीची मागणी खासदारांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार म...

August 8, 2024 8:08 PM

views 29

देशातील ७७ टक्क्यांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी – मंत्री सी आर पाटील

सरकारनं जल जीवन मिशन अंतर्गत देशभरातील ७७ टक्क्यांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी दिली आहे असं पूरक प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं. या योजने अतंर्गत आतापर्यंत १५ कोटी कुटुंबांना नळ जोडणी दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

August 8, 2024 7:33 PM

views 44

भारत २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल – नीती आयोग

देशाचा विकास दर सरासरी ५ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज लक्षात घेता, भारत, २०३०च्या दशकाच्या सुरुवातीला उच्च मध्यम-उत्पन्न गटातला, तर २०५० सालापर्यंत उच्च उत्पन्न गटातला देश बनेल असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. अरविंद वीरमणी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित जागतिक व्यापार विषयक परिषदेत डॉ. वीरमणी ...

August 8, 2024 7:29 PM

views 17

राज्यभरातल्या घाऊक बाजार समित्यांची येत्या २७ ऑगस्ट रोजी बंदची हाक

अन्नधान्यावर वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानं बाजार समितीनं आकारलेला नियमन कर रद्द करावा या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातल्या घाऊक बाजार समित्यांनी येत्या २७ ऑगस्ट रोजी बंदचा इशारा दिला आहे. या बंदमध्ये देशभरातल्या बाजार समितींचाही सहभाग असावा यासाठी उद्या दिल्ली इथं व्यापाऱ्यांची बैठक होणा...

August 8, 2024 7:31 PM

views 25

अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या देशांना अनिवासी नागरिकांनी पाठवलेल्या पैशामुळे मोठा लाभ – आरबीआय

अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या देशांना अनिवासी नागरिकांनी पाठवलेल्या पैशामुळे मोठा लाभ मिळत असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे. २०२९ सालापर्यंत अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून भारतात येणारं परकीय चलन १६० अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज असल्याचं यात म्हटलं आहे.