August 16, 2024 10:47 AM

views 19

राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं उद्घाटन केले. या NPPS च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कीटकनाशकांची माहिती मिळेल तसंच शेतकरी त्यांच्या हानिकारक प्रभावापासून पिकं वाचवू शकतील. अशी माहिती चौहान यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी...

August 16, 2024 3:20 PM

views 19

‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा

विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार यंदा अजित गोगटे, धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, ओंकार दाभाडकर, सचिन गायकवाड, गौरव ठाकूर आणि वनश्री राड्ये यांना दिले जाणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत किर्ती महाविद्यालयात पुरस्कार वितरण होईल, असं विश्व संवाद केंद्राने कळवलं आह...

August 16, 2024 10:15 AM

views 25

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून दोन दिवसांच्या तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी धनखड हैदराबाद, मधल्या कान्हा शांती वनमला भेट देतील.   उद्या ते अक्षरा विद्यालय परिसर आणि कौशल्य विकास केंद्र, स्वर्ण भारत ट्रस्ट आणि आंध्र प्रदेशातील नेल्लोर इथल्या मु...

August 15, 2024 8:26 PM

views 39

कोलकात्यातल्या R. G. कार वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड, ९ जणांना अटक

पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यातल्या R. G. कार वैद्यकीय महाविद्यालयात काही व्यक्तींनी काल रात्री तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली असून २६ जणांची ओळख पटली आहे. महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि खून प्रकरणी सीबीआयचं पथक आज या ठिकाणी पोहोचलं. दुसरं पथक महिलेच्या घरी गेलं आहे.

August 15, 2024 8:19 PM

views 39

जगभरात अनेक ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

जगभरात अनेक ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय समुदायानं आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. अबु धाबीमध्ये राजदूत संजय सुधीर यांच्या हस्ते दूतावासात भारतीय ध्वजारोहण झालं. आपल्या भाषणात त्यांनी भारताची उल्लेखनीय प्रगती आणि संयु...

August 15, 2024 8:09 PM

views 26

श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुुकीत ३९ उमेदवार रिंगणात

श्रीलंकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहे. २१ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. आर्थिक संकटानंतर श्रीलंकेत पहिल्यांदाच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा आणि मार्क्सवादी नेते अनुरा दिस्सानायके यात प्रमुख उमेदवा...

August 15, 2024 8:06 PM

views 25

पेतोंगटार्न शिनावात्रा यांना थायलंडच्या प्रधानमंत्री पदासाठी उमेदवारी

थायलंडच्या पॉप्युलर फेउ थाई पार्टीने आज पेतोंगटार्न शिनावात्रा यांची देशाच्या प्रधानमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली. उद्या प्रधानमंत्री पदासाठी होणाऱ्या संसदेच्या मतदानानंतर शिनावात्रा यांची निवड झाली तर त्या थायलंडच्या दुसऱ्या महिला प्रधानमंत्री बनतील. माजी प्रधानमंत्री स्रेथा थविसिन यांना...

August 15, 2024 7:56 PM

views 21

मासिक पाळीच्या काळात महिलांना एक दिवस रजा, ‘या’ राज्याचा निर्णय

ओडिशामध्ये नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या काळात एक दिवस रजा देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी आज जाहीर केला. सरकारी आणि खासगी नोकरीत असणाऱ्या महिलांना ही रजा मिळणार आहे. बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये अनुक्रमे दोन आणि तीन दिवसांची सुट्टी देण्यात येते.

August 15, 2024 7:50 PM

views 34

आसाममध्ये सुरक्षा दलाकडून शोध मोहिम सुरू

बंदी घालण्यात आलेल्या उल्फा या अतिरेकी संघटनेनं २४ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्यानंतर आसाममध्ये सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी शोध मोहिम राबवली. राज्यातून कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही. गुवाहाटीमध्ये काही ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्या असून न्याय वैद्यक चाचणीसाठी त्या पाठवल्याची माहिती पोलीस...

August 15, 2024 7:50 PM

views 32

मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं उद्घाटन

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं NPSS अर्थात राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं उद्घाटन केलं. NPPS द्वारे शेतकरी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची माहिती घेऊन आपल्या पिकांचं संभाव्य नुकसान टाळू शकतील असं चौहान यांनी यावेळी सांगितलं.   यावेळी त्यांनी के...