August 24, 2024 7:33 PM

views 9

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत – केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

मुलांना सर्वोत्तम कौशल्य तसंच भवितव्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी इथं पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत ...

August 24, 2024 7:30 PM

views 128

राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय

राज्यातल्या बहुतांश भागात आज पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे एसटी बस अडकून पडल्या आहेत. दरम्यान कर्ली आणि तेरेखोल नदी इशारा पातळी जवळून वाहत होत्या.  जालना शहरासह घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंभी, रामसगाव...

August 24, 2024 7:29 PM

views 22

पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं

पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टर चालकासह तीन जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे असून ते मुंबईहून हैदराबाद इथं जात होते. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून कमी दृश्यमानतेमुळे की अन्य कारणामुळे हा अपघात झाला हे अद्याप समजू शकलेले ...

August 24, 2024 7:41 PM

views 27

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठा भाऊ असेल – जितेंद्र आव्हाड

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठा भाऊ असेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मुंबईत महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. बदलापूरसह संपूर्ण राज्यातून समोर येणाऱ्या बलात्कार किं...

August 24, 2024 7:13 PM

views 20

शेवटच्या महिलेचा अर्ज येईपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरू राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत योजनेसाठी नोंदणी सुरूच राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून एक कोटी सात लाख लाभार्थ्यांच्या खात्यात...

August 24, 2024 7:02 PM

views 29

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन राज्य सरकारच्या राजीनाम्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी

  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या मुद्द्यावर पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज केवळ निदर्शनं करण्याचा निर्णय मविआने घेतला.     ठाण्यात काँग्रेसचे प्र...

August 24, 2024 6:54 PM

views 39

परभणीतल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक वीम्याचे पैसे आठवडाभरात देण्याचे केंद्र सरकारचे आदेश

परभणी जिल्ह्यातल्या जवळपास दोन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित असलेले दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम एका आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश आज दिले.  केंद्रीय कृषी म...

August 24, 2024 6:41 PM

views 47

नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

नेपाळमध्ये झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या २५ जणांचा समावेश असून त्यांचे मृतदेह भारतीय हवाई दलाच्या विमानाने  भारतात आणण्यात ...

August 24, 2024 6:35 PM

views 41

जालना इथं गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात 22 कामगार जखमी

जालना इथं गजकेसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटातल्या तीन गंभीर जखमी कामगारांना छत्रपती संभाजीनगर इथं हलवलं आहे. या अपघातात एकूण 22 कामगार जखमी झाले असून इतरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

August 24, 2024 5:39 PM

views 48

देशभरात येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचं केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचं आवाहन

देशभरात येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचं आवाहन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केलं आहे भारताला सुदृढ राष्ट्र बनवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाचा पुनरुच्चार मांडवीय यांनी यावेळी केला. प्रधानमंत्र्यांच्या फिट इंडिया चळवळीचं महत्व अधोर...