October 20, 2024 6:06 PM

views 23

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल शक्य असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मत

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल शक्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आर. जे. शंकर  नेत्र रुग्णालयाचं उदघाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या आरोग्य रणनीतीचे पाच स्तंभ त्यांनी यावेळी सांगितले....

October 20, 2024 5:53 PM

views 39

माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचं निधन

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरचे माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांचं आज पहाटे पुण्यात एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. बोरगावकर यांनी लातूर, बीड, धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं काही काळ प्रतिनिधित्व केलं होतं. तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्य...

October 20, 2024 3:48 PM

views 23

आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल ऍपवर ५७६ तक्रारी

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सी व्हिजिल या ऍपवर आतापर्यंत ५७६ तक्रारी आल्या असून त्यातल्या ५६३ तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक, खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास सात ...

October 20, 2024 3:44 PM

views 12

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक मुंबईत सुरू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्...

October 20, 2024 3:31 PM

views 16

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांचा प्रचाराला सुरुवात

बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांनी आज चकलांबा गावातून प्रचाराला सुरुवात केली. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीनं गेवराईत आपला उमेदवार जाहीर केला आहे.   गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडित आणि प...

October 20, 2024 3:27 PM

views 26

मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर प्रवाशाकडून 8 कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल बँकॉकहुन आलेल्या एक प्रवाशाकडून सुमारे ८ किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला असून या गांजाची किंमत अंदाजे ८ कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाश्याने हा गांजा खेळणी आणि अन्नपदार्थांच्या डब्ब्यात लपवला होता. या व्यक्तीला अमली पदार्थ नियंत्रण काय...

October 20, 2024 7:16 PM

views 18

राज्यात परतीच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान

राज्यात परतीच्या पावसानं जोर धरला असून अनेक जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालं आहे. अमरावती जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसामुळे शेतात असलेल्या सोयाबिनला त्याचा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरी आणलं असलं तरी शेतात पडून असलेलं सोयाबीन खराब होण्याची भीती आहे. काही ठिकाणी तुरीला आलेल्या फुलोऱ्या...

October 20, 2024 1:48 PM

views 29

टेनिस : स्विझ इनडोअर टूर्नामेंटमध्ये भारताच्या सुमित नागलकडून अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझचा पराभव

टेनिसमध्ये स्विझ इनडोअर टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या पात्रता फेरीत काल झालेल्या सामन्यात भारताच्या सुमित नागल याने अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझ अकॉस्टा याचा ५-७, ७-६, ७-७ असा पराभव केला. दुसऱ्या पात्रता फेरीत सुमितचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याच्याशी होणार आहे.    दरम्यान, प...

October 20, 2024 1:40 PM

views 23

इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू

इस्रायलनं गाझाच्या उत्तर भागातल्या बेत लाहिया परिसरात केलेल्या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयानं दिली आहे. इस्राईल लष्करानं गाझाच्या उत्तर भागात सुरू केल...

October 20, 2024 1:37 PM

views 24

इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला

इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून प्राबोवो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला आहे. इंडोनेशिया जगातली तिसरी मोठी लोकशाही असून ७३ वर्षांचे प्राबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती बनले आहेत. विशेष दलांचे माजी कमांडर असलेल्या प्राबोवो सुबियांतो यांना १४ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत जवळपास ६० टक...