October 22, 2024 5:58 PM

views 24

राष्ट्रकूल स्पर्धांमधून ‘या’ खेळांना वगळलं

आगामी राष्ट्रकूल स्पर्धांमधून हॉकी, क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन, स्क्वॅश आणि टेबल टेनिस सह अनेक खेळ वगळण्यात आले आहेत. यातल्या बहुतांश खेळांमध्ये भारताची पदकं निश्चित असतात. स्कॉटलंडमधल्या ग्लासगो शहरात २०२६ मध्ये होणाऱ्या या स्पर्धांमध्ये केवळ १० खेळांचा समावेश असणार आहे. त्यात अॅथलेटिक्स, जलतरण, आर्...

October 22, 2024 3:57 PM

views 56

भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार

भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमध्ये होणाऱ्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती नितेश राणे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. हे सगळं पक्षीय धोरण असल्याचं सांगून  महायुतीच्या फार्म्युल्यान...

October 22, 2024 3:53 PM

views 43

भाजपा नेते राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपा नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. महायुतीचं जागावाटप लवकरच जाहीर होईल आणि त्याची घोषणा होईल, असं ते म्हणाले. आमच्या पक्षाकडे पुरेशा जागा आहेत, त्यामुळं पक्ष सोडून जाणाऱ्यां...

October 22, 2024 6:29 PM

views 174

महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात

महाविकास आघाडीत आता अवघ्या काही जागांबाबत सहमती व्हायची आहे. उर्वरित जागांवर सहमती झाल्याचं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलंय. उर्वरित जागांविषयी चर्चा करण्यासाठी दुपारी साडे ३ वाजता पुन्हा बैठक होणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं....

October 22, 2024 3:43 PM

views 17

नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची भाजपला सोडचिठ्ठी

भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वाशी इथं पक्षाच्या निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जा...

October 22, 2024 3:14 PM

views 30

केंद्रीय अर्थमंत्रालयाची ५ राष्ट्रीय बँकांना मुख्य महाव्यवस्थापक हे पद निर्माण करण्यास मंजुरी

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आणखी पाच राष्ट्रीय बँकांना मुख्य महाव्यवस्थापक हे पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक तसंच युको बँकेचा समावेश आहे. ज्या बँकामध्ये सीजीएम हे पद अगोदरच अस्तित्वात आहे, तिथे या पदांची संख्या ...

October 22, 2024 3:06 PM

views 32

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय ...

October 22, 2024 2:57 PM

views 26

भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुवर्णा’ या युद्धनौकेची टांझानियामध्ये दार-ए-सलाम या बंदराला भेट

भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुवर्णा’ या युद्धनौकेनं १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान, टांझानियामध्ये दार-ए-सलाम या बंदराला भेट दिली. आयएनएस सुवर्णा, सध्या एडनच्या आखातात सागरी चाचेगिरी विरोधी मोहिमेवर तैनात आहे.   आयएनएस सुवर्णाच्या दार-ए-सलाम बंदर भेटी दरम्यान भारत आणि टांझानियाच्या नौदलांनी परस्परांशी औपचारि...

October 22, 2024 8:33 PM

views 39

‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल

बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेलं  ‘दाना’ चक्रीवादळ ओदिशा किनारपट्टीच्या दिशेनं पुढे सरकत आहे. हे वादळ येत्या गुरुवार आणि शुक्रवार दरम्यानच्या मध्यरात्री ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात धडकेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.    ओदिशा किनारपट्टीवरच्या भित...

October 22, 2024 2:41 PM

views 17

डिजिटल सुविधांमधल्या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

डिजिटल सुविधांमधल्या गुंतवणुकीमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणखी मजबूत झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं.अमेरिकतल्या कोलंबिया विद्यापीठात त्या बोलत होत्या. भांडवलाच्या उपलब्धतेमुळे भारतीय बँकिंग व्यवस्था बळकट राहिल्याचंही त्या म्हणाल्या.महत्त्वाच्या उद्योगांमधली गुंतवणूक ...