October 23, 2024 8:40 PM

views 31

इफ्फी महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू

येत्या २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गोवा इथं होणाऱ्या ५५व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रेलिया ‘कंट्री ऑफ फोकस’ राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि ओळख दाखवणारे ७ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. फिल्म बजार, ...

October 23, 2024 10:26 AM

views 7

झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार

  झारखंडमध्येही विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 13 नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दल यांनी उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली.   झारखंड ...

October 23, 2024 10:20 AM

views 56

कर्तारपूर साहिब कॉरिडॉर कराराची वैधता आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्यास भारत आणि पाकिस्तानची मान्यता

भारत आणि पाकिस्ताननं कर्तारपूर साहिब कॉरिडॉर कराराची वैधता आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचं मान्य केलं आहे. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरद्वारे भारतातील यात्रेकरूंना पाकिस्तानमधील कर्तारपूर इथल्या पवित्र गुरुद्वारा दरबार साहिब, नारोवाल या ठिकाणांना भेट देता येते. यापूर्वी पाच वर्षांसाठी 24 ऑक्टोबर 2019 मध्य...

October 23, 2024 3:09 PM

views 26

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठीची अधिसूचना काल जारी करण्यात आली; त्याचबरोबर उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. विधानसभा निवडणुकीसाठी 20...

October 23, 2024 9:51 AM

views 34

बीएसएनएलतर्फे सात नव्या ग्राहक-केंद्रित सेवा सुरू

बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सात नव्या ग्राहक-केंद्रित सेवा सुरू केल्या आहेत. कंपनीचं नवीन बोधचिन्ह आणि सात नव्या सेवांचं अनावरण करताना केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याबद्दल माहिती दिली. स्पॅम-फ्री नेटवर्क, नॅशनल वाय-फायरोमिंग, इंट्राने...

October 22, 2024 8:36 PM

views 22

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पुढच्या बैठकीला हजेरी लावायला मनाई

वक्फ सुधारणा विधेयकासाठी स्थापन झालेल्या संसदेच्या संयुक्त समितीनं तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना पुढच्या बैठकीला हजेरी लावायला मनाई केली आहे. संसदेत आज झालेल्या बैठकीत बॅनर्जी यांनी गैरवर्तन केल्यानंतर हा निर्णय झाला. भाजपा खासदार अभिजित गंगोपाध्याय यांच्यासोबत बॅनर्जी यांचा वाद झाला...

October 22, 2024 8:50 PM

views 8

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग विरोधात खटल्यांच्या सुनावणीसाठी मंजुरी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याच्या विरोधात २०१५साली दाखल झालेल्या खटल्यांची सुनावणी करायला मंजुरी दिली आहे. डेरा सच्चा सौदाच्या राष्ट्रीय समितीच्या तीन सदस्यांविरोधात खटला चालवायलाही राज्य सरकारनं यावेळी मंजुरी दिली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्याया...

October 22, 2024 8:24 PM

views 22

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते बीएसएनएलच्या नव्या लोगोचं उद्घाटन

स्वतःचे फोर जी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या जगातल्या सहा देशांपैकी भारत हा एक देश असून लवकरच फाईव्ह जी तंत्रज्ञान विकसित केलं जाईल, असं प्रतिपादन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज दिल्ली इथं केलं. बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडच्या नव्या लोगोचं  आणि नव्या ७ सेवांचं उद्घाटन त...

October 22, 2024 8:12 PM

views 20

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘६व्या भारत-सिंगापूर संरक्षण मंत्री संवादाचं’ सहअध्यक्षपद भूषवलं

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं सिंगापूरचे संरक्षण मंत्री  डॉ. एनजी इंग्ज हेन यांच्या बरोबर 'सहाव्या भारत-सिंगापूर संरक्षण मंत्री संवादाचं ' सह-अध्यक्षपद भूषवलं. दोन्ही देशांमधली सामायिक धोरणात्मक भागीदारी, परस्परांबरोबरच्या वाढत्या संबंधांचं द्योतक असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावे...

October 22, 2024 8:08 PM

views 24

रशिया – युक्रेन युद्धावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा प्रधानमंत्र्यांकडून पुनरुच्चार

रशिया आणि युक्रेन युद्धावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठिंबा असेल. त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचीही आमची तयारी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. रशिया...