October 24, 2024 3:44 PM

views 32

२३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विश्वजित मोरेनं पटकावलं कांस्यपदक

अल्बानियात तिराना इथं सुरू असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या विश्वजित रामचंद्र मोरे या कुस्तीगीरानं कांस्यपदक पटकावलं. त्यानं पुरुषांच्या ५५ किलो ग्रीको रोमन गटात अॅडम उलबाशेव्हचा १४-१० असा पराभव केला. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलचं पदक आहे. इराणच्या अली अब्दुल्लाअह...

October 23, 2024 8:48 PM

views 13

प्रधानमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्यावर खटला दाखल

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसचे साहरणपुरचे खासदार इम्रान मसूद यांच्यावर उत्तर प्रदेशातल्या विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याबाबत न्यायालयानं १९ गावकऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान मसूद यांनी...

October 23, 2024 8:40 PM

views 21

देशातल्या नागरिकांकडून रोख रकमेचा वापर कमी – आरबीआय

देशातल्या नागरिकांकडून रोख रकमेचा वापर कमी होत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. गेल्या ३ वर्षात डिजिटल व्यवहारांचं प्रमाण १९ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. यात यूपीआयचा वाटा महत्त्वाचा आहे, असं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थतज्ज्ञांच्या एका शोधनिबंधात म्हटलं आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या ...

October 23, 2024 8:36 PM

views 10

कृष्ण जन्मभूमी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

मथुरामधल्या शाही ईदगाह-श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी सर्व दिवाणी खटल्यांची एकाच वेळी सुनावणी घेण्याचे आदेश मागे घेण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. न्यायमूर्ती मयंककुमार जैन यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं न्यायालयीन कार्यक्षमतेचा हवाला देत या प्रकरणांची एकत्रित सुनाव...

October 23, 2024 8:32 PM

views 19

वायनाड मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांचा उमेदवारी अर्ज

केरळमधल्या वायनाड मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रियांका गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी त्या कलपेट्टा इथं आयोजित केलेल्या रोड शो मध्ये सहभागी झाल्या. वायनाडचा भाग होणं ही आपल्यासाठी आनंद आणि सन्मानाची बाब असल्याचं यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी काँग्रे...

October 23, 2024 8:51 PM

views 39

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा

भारत आणि चीनमधले मतभेद आणि विवाद योग्यरित्या हाताळून शांतता बिघडू न देणं अत्यावश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केलं. कझान इथं सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत ...

October 23, 2024 8:23 PM

views 10

ब्रिक्स देशांनी एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा – प्रधानमंत्री

ब्रिक्स देशांनी एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. तसंच या मुद्यांवर दुहेरी निष्ठेला बिलकुल जागा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रशियामधल्या कझान इथं १६व्या ब्रिक्स परिषदेच्या सत्राला ते संबोधित करत होते. युवकांमध्...

October 23, 2024 7:39 PM

views 63

राज्यात सोनं-चांदीच्या दरात वाढ

राज्यात तोळ्यामागे सोन्याचे दर तोळ्यामागे ८० हजारांच्या पुढे गेले असून चांदी किलोमागे १ लाख रुपये झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं-चांदी आज सुमारे ४००-५०० रुपयांनी महागलं. २४ कॅरेट सोनं जीएसटी शिवाय ७८ हजार ७०० रुपये तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचे व्यवहार ७८ हजार ४०० रुपये दराने होत होते. चांदीचे व्यवहार ९...

October 23, 2024 7:29 PM

views 36

काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर सुलभा खोडके यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

October 23, 2024 7:21 PM

views 24

भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

माजी मंत्री, भाजपा नेते  लक्ष्मण ढोबळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. ढोबळे पक्षात आल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षबांधणीसाठी होईल, असं सुळे यावेळी म्हणाल्या. तर आपण अजित पवार यांच्याशी मतभेद...