November 25, 2025 7:09 PM

views 22

नागरिकांच्या तक्रारींसाठी रत्नागिरी पोलिसांचा नवा उपक्रम

नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदवता याव्यात, समस्या मांडता याव्यात किंवा माहिती पाठवता यावी यासाठी रत्नागिरी पोलिसांनी आता आधुनिक तंत्राची मदत घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नसेतू नावाचा स्मार्ट एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सुरू करण्यात आला असून, कोकण परिक्षेत्राचे विशेष ...

November 25, 2025 7:34 PM

views 53

नवी दिल्लीत उद्या संविधान दिनाचा कार्यक्रम होणार

संविधान दिनाच्या निमित्तानं उद्या नवी दिल्लीत संविधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे. भारतानं १९४९ साली याच दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला तसंच संसदेच्या दोन्ही स...

November 25, 2025 6:37 PM

views 18

गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या  ३५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण केलं. यावेळी हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष, मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आणि हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन ...

November 25, 2025 3:38 PM

views 102

२९ कामगार कायदे चार कामगार संहितामधे समाविष्ट-पियूष गोयल

मंजुरी मिळण्यातले अडथळे कमी करण्यासाठी आणि कागदपत्रं सुटसुटीत करण्यासाठी २९ कामगार कायदे  चार कामगार संहितामधे समाविष्ट केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं नॅशनल ट्रेड लीडर परिषदेत ते आज बोलत होते.   नवीन कामगार संहितांमुळे कामगारांना किमान हम...

November 25, 2025 3:35 PM

views 18

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येक जहाज आत्मनिर्भरतेचं प्रतीक- संरक्षण मंत्री

भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं प्रत्येक नवीन जहाज पूर्णपणे भारतात तयार होत असून देशाच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज समुद्र उत्कर्ष परिसंवादात ते बोलत होते.   देशाचा ९५ टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो असं त्यांनी सांगितलं. भारतीय गोद...

November 25, 2025 7:34 PM

views 116

अयोध्येतल्या श्रीराममंदिरात धर्मध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येमधल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं. राममंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे.   विवाह पंचमीच्या मुहुर्तावर होत असलेल्या धर्मध्वज सोहळ्यानिमित्त  देशभरातून हजारो भाविक अयोध्यानगरीत जमले असून सर्वत्र जय श्रीरामच...

November 25, 2025 3:21 PM

views 68

नवीन कामगार कायद्यांमुळे बेरोजगारीत १.३ दशांश टक्केपर्यंत घट होईल- SBI

नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होऊन बेरोजगारीत १ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. २१ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या कायद्यांमुळं संघटित कामगारांचं प्रमाण किमान १५ टक्क्यांनी वाढून सुमारे साडे ७५ टक्...

November 25, 2025 3:20 PM

views 115

निवडणुका : आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका – सर्वोच्च न्यायालय

राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, तिथं आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडू नका, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात असल्याप्रकरणी सरन्यायाधीश न...

November 25, 2025 3:10 PM

views 20

इफ्फी महोत्सवात आज दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यात आली

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांनी धर्मेंद्र यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. धर्मेंद्र यांच्या निर्मिती संस्थेत तयार झालेल्या ‘बेताब’ या चित्रपटाचं दिग्दर्शन र...

November 25, 2025 2:59 PM

views 37

सुलतान अझलान शाह चषक हॉकी सामन्यात भारताचा पराभव

मलेशियात इपोह मध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलान शाह चषक हॉकी सामन्यात बेल्जीयमच्या संघाने भारताचा २ -३ असा पराभव केला. भारताने गेल्या रविवारी तिबार विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केल्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. भारताचा पुढला सामना उद्या मलेशियाच्या संघाबरोबर होईल.