November 6, 2024 8:44 AM

views 91

वंचित बहुजन आघाडीचा ‘जोशाबा समतापत्र’ जाहीरनामा प्रकाशित

महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेला वंचित बहुजन आघाडीचा 'जोशाबा समतापत्र' या नावाचा निवडणूक जाहीरनामा काल पुण्यात, पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. महिलांना मासिक 3500 रुपये वेतन, शेतमालाला...

November 6, 2024 8:36 AM

views 47

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच...

November 6, 2024 1:25 PM

views 41

इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षणमंत्री योव गॅलंट यांना पदावरून हटवलं

इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षणमंत्री योव गॅलंट यांना पदावरून हटवलं आहे. नेतन्याहू यांनी गॅलंट यांच्यावर इस्रायल कॅबिनेटच्या विरोधात निर्णय घेतल्याचा आणि अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या शत्रूंना मदत केल्याचा आरोप केला आहे. गॅलंट यांच्या जागी परराष्ट्रमंत्री इस्रायल काट्झ यांची नियु...

November 5, 2024 8:26 PM

views 25

इफ्फीमध्ये यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचेही चित्रपट दाखवणार

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्या समृद्ध वारशाला आदरांजली वाहण्यासाठी पुनर्संचयित केलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यात राज कपूर यांचा आवारा, तपन सिन्हा दिग्दर्शित हार्मोनियम, अक्किनेनी नागेश्वर राव यांचा ...

November 6, 2024 7:25 PM

views 31

पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेचं आयोजन

भारताला जगात आशयनिर्मिती आणि निर्यातीचं मोठं केंद्र बनवण्याच्या उद्देशानं पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात वेव्ह, अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेचं आयोजन नवी दिल्लीत होणार असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज मुंबईत दिली. विविध चित्रपट निर्मिती संस्था,...

November 5, 2024 8:12 PM

views 25

उद्धव ठाकरे यांची पक्षातल्या ५ नेत्यांवर निलंबनाची कारवाई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षातील ५ नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्यानं निलंबनाची कारवाई केली. यात माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे. काल पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार उमेदवा...

November 5, 2024 8:32 PM

views 73

महाविकास आघाडीला निवडून देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये आज घेतलेल्या प्रचार सभेत पाच आश्वासन मतदारांना देत महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलं.    महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतीमालाला हमीभाव देण्याचं आश्वासन ठाकरे यांनी दिलं. विद्यार्थींनीबरोबरच विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिलं...

November 5, 2024 8:05 PM

views 24

अपक्ष उमेदवारांबाबत परस्पर सामंजस्याने तोडगा काढू – सुनील तटकरे

महायुतीच्या जागावाटपानंतरही अपक्ष म्हणून काही उमेदवार उभे राहिले असून त्याबाबत परस्पर सामंजस्याने तोडगा काढू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.   भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघा...

November 5, 2024 8:02 PM

views 23

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या ३ पुस्तकांचं प्रकाशन

न्यायव्यवस्थेनं निष्पक्ष समाजाच्या दिशेनं देशाची वाटचाल बळकट केली पाहिजे असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलं. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात सर्वोच्च न्यायालयाच्या ३ पुस्तकांचं प्रकाशन केल्यानंतर त्या बोलत होत्या. 'जस्टिस फॉर द नेशन' - सर्वोच्च न्यायालय, भारतातील कारागृहे यांच्या ७५ व...

November 5, 2024 7:35 PM

views 25

राष्ट्रपती भवनात आयोजित ‘सृजन २०२४’ निवासी कला शिबिरात अमरावतीतल्या सुमित्रा आहके सहभागी

राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सृजन २०२४ या दहा दिवसांच्या निवासी कला शिबिरात अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या सुमित्रा आहके सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात सुमित्रा यांनी काढलेली वारली चित्रं, गाव आणि शहरातील फरक दर्शविणारं चित्र, देवस्वरुप मानला जाणारा वाघ आणि लुप्त होत चाललेले आदिवासी कलाप्र...