November 13, 2024 9:32 AM

views 12

इ कॉमर्सच्या माध्यमातून होणाऱ्या अन्नपदार्थांच्या विक्रीबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरणाच्या सूचना

इ कॉमर्सच्या माध्यमातून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची वापरण्यायोग्य असण्याची मुदत ते ग्राहकांना मिळाल्यानंतर किमान ४५ दिवसांपर्यंत असेल याची खबरदारी घेण्यात यावी असं भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरणानं म्हटलं आहे. त्यानुसार या कंपन्यांनी आपली कार्यपद्धती ठरवावी असं प्राधिकरणा...

November 13, 2024 1:50 PM

views 15

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या विकासप्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. यामध्ये दरभंगा इथं उभारण्यात येणाऱ्या एम्स संस्थेच्या पायाभरणी समारंभाचा समावेश आहे. या एम्स संस्थेत सुसज्ज आधुनिक रुग्णालयासह आयुष विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय आणि नि...

November 13, 2024 9:22 AM

views 23

देशातल्या 11 राज्यातील 33 विधानसभा जागांसाठी तसेच वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

देशातल्या 11 राज्यातील 33 विधानसभा जागांसाठी तसच केरळ मधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राजस्थानमधल्या ७ , पश्चिम बंगाल ६ , आसाम ५, बिहार ४, कर्नाटकमधल्या ३ तर मध्यप्रदेश आणि सिक्कीम मधल्या 2 विधानसभा जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. तसंच केरळ, छत्तीसगड, गुजरात आण...

November 13, 2024 9:02 AM

views 20

रत्नागिरी जिल्ह्यात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांना पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी शाखेने घेतलं ताब्यात

रत्नागिरी जिल्ह्यात नाखरे गावांत बेकायदा वास्तव्यास असलेल्या १३ बांग्लादेशी नागरिकांना काल रत्नागिरी पोलिस दलाच्या दहशतवादविरोधी शाखेनं ताब्यात घेतलं. त्यांच्यावर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

November 13, 2024 1:51 PM

views 32

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. विविध राजकीय पक्षांच्या केंद्रिय नेत्यांच्या प्रचारसभा राज्यात होत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू आहे. अन्य काही राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रीदेखील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठ...

November 12, 2024 8:40 PM

views 10

महिलांच्या आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर भारताचा विजय

महिलांच्या आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत भारतानं तीन वेळच्या विजेत्या दक्षिण कोरियाचा ३-२ असा पराभव केला. बिहारमधे राजगीर इथं हा सामना झाला. भारतातर्फे संगीता कुमारीनं तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल केला. दिपीका सेहरावतनं दोन गोल केले.  भारतानं काल मलेशियावर ४-० नं मात करत विजयी सलामी दिली. सलग दोन विजयां...

November 12, 2024 8:37 PM

views 5

सगळ्यांच्या हितासाठी झटण्याची प्रेरणा महात्मा गांधी यांच्या विचारातून मिळते – प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल

सगळ्यांच्या हितासाठी झटण्याची प्रेरणा महात्मा गांधी यांच्या विचारातून मिळते, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल म्हणाले. नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं झालेल्या सार्वजनिक सेवा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशभरात माहिती आणि शिक्षणाचा प्रसार करणं आणि सांस्कृतिक विविधता जपणं यासाठी आकाशवा...

November 12, 2024 8:32 PM

views 21

CISF मध्ये पूर्णपणे महिलांचा समावेश असलेल्या पहिल्या बटालियनच्या स्थापनेला केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी

CISF अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातल्या पूर्णपणे महिलांचा समावेश असलेल्या पहिल्या बटालियनला केंद्रीय गृहमंत्रालयानं आज मंजुरी दिली. CISF च्या ५३ व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले होते. सध्या यात दलात ७ टक्के महिला आहेत. नव्या बटालियनची भरती, प्रशिक्षण आणि...

November 12, 2024 8:30 PM

views 16

ग्राहकांना येणाऱ्या समस्यांवर दूरसंचार मंत्रालयाचं लक्ष

मोबाइल कॉल न लागणं, बोलता बोलता कॉल बंद होणं यासारख्या ग्राहकांना येणाऱ्या समस्यांवर दूरसंचार मंत्रालय लक्ष ठेवून आहे. यासंदर्भातल्या निकषांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना दंड ठोठावण्याचा मंत्रालयाचा विचार आहे. सध्या वर्षातून चार वेळा ऐवजी दर महिन्याला कॉल्सच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवलं जातं आहे.

November 12, 2024 8:26 PM

views 18

निष्पक्षपणे काम करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे केंद्रीय निरीक्षकांना निर्देश

कोणत्याही पक्षाला प्राधान्य न देता निष्पक्षपणे काम करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्रीय निरीक्षकांना दिले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तैनात निरीक्षकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व उमेदवारांशी संपर्क ठेवा आणि त्यांच्या तक्रारी गांभीर्यानं घेण्याचे आदेश त्यांनी दि...