November 14, 2024 1:38 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना डॉमिनिका देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना डॉमिनिका देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. कोविड महामारीच्या काळातल्या कामगिरीच्या गौरवार्थ, आणि दोन्ही देशांतली भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. गयाना इथं होणाऱ्या इंडिया CARICOM या परि...

November 14, 2024 1:32 PM

views 14

प्रधानमंत्री येत्या शनिवारपासून नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या ६ दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना दिली. १९व्या जी वीस शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी १८ आणि १९ नोव्हेंबरला ब्राझीलला भेट देणार असून त्यांचा हा त...

November 13, 2024 8:40 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्यात ३ प्रचार सभा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्यात ३ प्रचार सभा घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारी, नवीमुंबई आणि मुंबईत शिवाजीपार्कवर संध्याकाळी ते सभा घेणार आहेत.  विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या दुपारी नंदूरबारमध्ये आणि त्यानंतर नांदेडमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर...

November 13, 2024 8:26 PM

views 24

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची चिंता व्यक्त

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदार परिषदेच्या राजकीय, सुरक्षा, सामाजिक आणि सांस्कृतिक समितीच्या दुसऱ्या बैठकीत ते नवी दिल्ली इथं बोलत होते. यावेळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्र...

November 13, 2024 8:24 PM

views 9

मनोरंजन क्षेत्रातल्या नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध – संजय जाजू

गेमिंग, ऍनिमेशन आणि मनोरंजन क्षेत्रातल्या नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. याचं हेतूने सरकारने आयआयसीटी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजची स्थापना केली आहे, असं ते म्हणाले. हैदराबाद इथं इंडिया गेम डेव्ह...

November 13, 2024 8:20 PM

views 34

IFFI मध्ये सुवर्ण मयुर पुरस्कारासाठी १५ चित्रपटांमध्ये स्पर्धा

जगभरातल्या सर्वोत्तम कथानक मांडणाऱ्या चित्रपटाला दिल्या जाणाऱ्या सुवर्ण मयूर पूरस्कारसाठी IFFI अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १५ चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहेत.  यामध्ये भारताच्या, द गोट लाईफ या मल्याळम भाषेतल्या, आर्टिकल ३७० या हिंदी आणि रावसाहेब या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. ...

November 13, 2024 8:15 PM

views 14

अमेरिकेत नवनवीन नियुक्त्या करायला सुरुवात

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवनवीन नियुक्त्या करायला सुरुवात केली आहे. माजी लष्करी पेट हेगसेठ हे अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री असतील. माइक वाल्टझ यांची अमेरिकेचे आगामी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ट्रम्प यांनी नियुक्ती केली आहे. जॉन रॅटक्लिफ यांना CIA चं संचालक म्हण...

November 13, 2024 8:06 PM

views 17

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून  ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून  विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमतीच्या तुल...

November 13, 2024 8:27 PM

views 15

महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

महायुतीचं सरकार राज्यात असेल तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळे इथं व्यक्त केला. लांगुलचालनाच्या भावनेने पछाडलेल्या महाविकास आघाडीने देशाच्या सुरक्षेला वेठीला धरल्याची टीकाही शाह यांनी यावेळी केली. मात्र, केंद...

November 13, 2024 7:46 PM

views 34

देशातल्या शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजारांमधे आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ९८४ अंकांची घसरण झाली. आणि तो ७७ हजार ६९१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३२४ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ५५९ अंकांवर बंद झाला.   सेन्सेक्स निर्देशांकातल्या ३० पैक...