November 13, 2024 8:24 PM November 13, 2024 8:24 PM

views 3

मनोरंजन क्षेत्रातल्या नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध – संजय जाजू

गेमिंग, ऍनिमेशन आणि मनोरंजन क्षेत्रातल्या नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. याचं हेतूने सरकारने आयआयसीटी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजची स्थापना केली आहे, असं ते म्हणाले. हैदराबाद इथं इंडिया गेम डेव्ह...

November 13, 2024 8:20 PM November 13, 2024 8:20 PM

views 18

IFFI मध्ये सुवर्ण मयुर पुरस्कारासाठी १५ चित्रपटांमध्ये स्पर्धा

जगभरातल्या सर्वोत्तम कथानक मांडणाऱ्या चित्रपटाला दिल्या जाणाऱ्या सुवर्ण मयूर पूरस्कारसाठी IFFI अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १५ चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहेत.  यामध्ये भारताच्या, द गोट लाईफ या मल्याळम भाषेतल्या, आर्टिकल ३७० या हिंदी आणि रावसाहेब या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. ...

November 13, 2024 8:15 PM November 13, 2024 8:15 PM

views 8

अमेरिकेत नवनवीन नियुक्त्या करायला सुरुवात

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवनवीन नियुक्त्या करायला सुरुवात केली आहे. माजी लष्करी पेट हेगसेठ हे अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री असतील. माइक वाल्टझ यांची अमेरिकेचे आगामी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ट्रम्प यांनी नियुक्ती केली आहे. जॉन रॅटक्लिफ यांना CIA चं संचालक म्हण...

November 13, 2024 8:06 PM November 13, 2024 8:06 PM

views 10

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून  ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून  विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमतीच्या तुल...

November 13, 2024 8:27 PM November 13, 2024 8:27 PM

views 13

महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

महायुतीचं सरकार राज्यात असेल तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळे इथं व्यक्त केला. लांगुलचालनाच्या भावनेने पछाडलेल्या महाविकास आघाडीने देशाच्या सुरक्षेला वेठीला धरल्याची टीकाही शाह यांनी यावेळी केली. मात्र, केंद...

November 13, 2024 7:46 PM November 13, 2024 7:46 PM

views 12

देशातल्या शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजारांमधे आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ९८४ अंकांची घसरण झाली. आणि तो ७७ हजार ६९१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३२४ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ५५९ अंकांवर बंद झाला.   सेन्सेक्स निर्देशांकातल्या ३० पैक...

November 14, 2024 1:17 PM November 14, 2024 1:17 PM

views 15

१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक

१० राज्यांतल्या ३१ विधानसभा मतदारसंघ आणि केरळातल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं. यामध्ये राजस्थानातले सात, पश्चिम बंगालमधले सहा, आसाममधले पाच, बिहारमधले चार, कर्नाटकातले तीन आणि मध्य प्रदेशातल्या दोन जागांचा समावेश आहे. याशिवाय केरळ, छत्तीसगड, गुजरात आणि मेघालयमध्ये...

November 13, 2024 8:29 PM November 13, 2024 8:29 PM

views 23

महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची खर्गे यांची टीका

राज्यातलं महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज लातूर इथल्या प्रचारसभेत केली. केंद्रातलं भाजपा सरकार शेतमालावर जीएसटी लावून शेतकऱ्यांची लूट करत आहे, सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ केली जात नाही अशी टीका खर्गे यांनी केली....

November 13, 2024 7:43 PM November 13, 2024 7:43 PM

views 7

विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी कोचिंग संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर

विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी, सर्व कोचिंग संस्थांसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं आज सर्वंकष मार्गदर्शक तत्वं जारी केली. विविध शिकवणी वर्गांकडून दिल्या जाणाऱ्या, दिभाभूल करणाऱ्या जाहीरातींविरोधात केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली इथं ही मार्गदर्शक...

November 14, 2024 3:05 PM November 14, 2024 3:05 PM

views 15

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.५१ टक्के मतदान

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतल्या ४३ मतदारसंघांमध्ये काल ६६ पूर्णांक ५१ शतांश टक्के मतदान झालं. सर्वाधिक म्हणजे ७९ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान खरसावन इथं नोंदवलं गेलं. काल ६८३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं. सरायकेलामधून भाजपचे माजी मुख्यमंत्री चंपाई सो...